हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

मुंबई | प्रो-कबड्डी 2018मध्ये मोनु गोयतला तब्बल 1 कोटी 51 रुपये मोजत हरियाणा स्टिलर्सने आपल्या संघात घेतले. तो प्रो-कबड्डी इतिहासीतील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

याच लिलावातच राहुल चौधरी 1 कोटी 29 लाख रुपये मिळाले होते. त्याला मागे टाकत मोनु सर्वात महागडा खेळाडू ठरला.

त्याच्यासाठी मुंबई, दिल्ली, हरियाणा संघामध्ये जारदार चुरस पहायला मिळाली. अखेर हा महत्त्वाचा खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्यात हरियाणाला यश आले.

मोनु गोयतच्या फेडरेशन कप तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळेच त्याला एवढी बोली लागल्याचे बोलले जात आहे. हा 25 वर्षीय खेळाडू चौथ्या हंगामात बंगाल तर गेल्या हंगामात पाटणाकडून खेळला.

तो सेनादलकडून कबड्डी खेळत आहे. 39 सामन्यात त्याने 250 गुण घेतले आहेत. यावेळी राहुल चौधरी हा सर्वात महागडा खेळाडू ठरेल असे वाटले असताना सर्वांचे अंदाज चुकवत मोनुने लिलावात बाजी मारली.

राष्ट्रीय स्पर्धेत हुकलेल्या विजेतेपदाचा वचपा काढताना त्याने मुंबईत झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला

-अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया

संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली

आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!

या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!

तेव्हाच होईल महिलांची प्रो-कबड्डी पुन्हा सुरु!