महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली

मुंबई | भारतातील आयपीएल पाठोपाठची सर्वाधिक लोकप्रिय लीग असलेल्या प्रो कबड्डीचा सहावा हंगाम जवळ आला आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव लवकरच होणार आहे.

ज्या संघांना आपले खेळाडू कायम ठेवायचे होते त्यांनी ते कायम केले आहे. आता लिलावासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर होणार आहे. सध्या जी संभाव्य यादी सुत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार डोमेस्टीक, ओव्हरसिज आणि न्यु यंग प्लेअर्स असे गट यावेळी करण्यात आले आहेत. त्यातही पुन्हा आॅलराऊंडर, रेडर आणि डिफेंडर असे गट आहेत.

डोमेस्टीक प्लेअर्समध्ये रेडरच्या A गटात महाराष्ट्रातील ३ खेळाडूंची नावे आहेत. त्यात काशिलिंग अडके, रिशांक देवडिगा आणि श्रीकांत जाधव यांचा समावेश आहे. आॅलराऊंडर आणि डिफेंडरच्या A गटात महाराष्ट्राचा एकही खेळाडू नाही.

डोमेस्टीक प्लेअर्स डिफेंडरच्या B गटात सचिन शिंगाडे, निलेश शिंदे, विशाल माने आणि विराज लांडगे यांची नावे आहेत.

डोमेस्टीक प्लेअर्स रेडरच्या B गटात तुषार पाटीलचे नाव आहे तर डोमेस्टीक प्लेअर आॅलराऊंडर  गट- Cमध्ये अजिंक्य कापरे, अमिर धुमाळ, दादासो आवाड दुर्वेश पाटील, महेश मगदुम, सुयोग राजपाकर आणि योगेश सावंत यांचा समावेश आहे.

बाकी खेळाडूंची नावे वेगवेगळ्या गटात आहेत.

असे आहेत गट- 

ओव्हरसिज प्लेअर- 
रेडर (A, B, C)
आॅलराऊंडर (A, B, C)
डिफेंडर (A, B, C)

डोमेस्टीक प्लेअर- 
रेडर (A, B, C)
आॅलराऊंडर (A, B, C)
डिफेंडर (A, B, C)

न्यु यंग प्लेअर्स
रेडर
आॅलराऊंडर
डिफेंडर