प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरीष एर्नाक सहावा बचावपटू

पुणे। प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात आज(20 आॅक्टोबर) पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा संघात सामना पार पडला. या सामन्यात पुणेरी पलटन संघाने 33-32 अशा फरकाने विजय मिळवला. 
घरच्या मैदानावरील पुणेरी पटलटनचा हा सलग दुसरा विजय आहे. तसेच पुण्याचा कर्णधार गिरीष एर्नाकने एक खास विक्रम केला आहे. 

 

त्याने प्रो कबड्डीमध्ये 200 टॅकल पॉइंट्स पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो एकूण सहावा कबड्डीपटू ठरला आहे. हा विक्रम त्याने त्याच्या 76 व्या सामन्यात केला आहे.

याआधी अशी कामगिरी मनजित चिल्लर, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, मोहित चिल्लर आणि रविंद्र पहल या पाच डीफेंडर्सने केली आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक टॅकल पॉइंट्स घेणारे कबड्डीपटू:

262 – मनजित चिल्लर (सामने – 80)

225 – संदीप नरवाल (सामने – 89)

222 – सुरेंदर नाडा (सामने – 71)

217 – मोहित चिल्लर (सामने – 80)

215 – रविंद्र पहल (सामने – 70)

200 – गिरीष एर्नाक (सामने – 76)

महत्त्वाच्या बातम्या:

सई ताम्हणकरचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मधील संघ कोल्हापुरी मावळे

यशवंत सातारा करणार झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये साताऱ्याचे प्रतिनिधित्व

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीगमध्ये राहुल आवारे पुण्याच्या संघात