आणि तो बनला प्रो-कबड्डीमध्ये 1 कोटी मिळालेला पहिला भारतीय खेळाडू

मुंबई | आज प्रो-कबड्डीच्या 6व्या हंगामासाठी दिपक श्रीनिवास हुडाला जयपुर पिंक पॅंथरने चक्क 1 कोटी 15 लाख रुपये देऊन संघात घेतले. त्याला संघात घेण्यासाठी दबंग दिल्ली, हरीयाणा स्टीलर्स आणि जयपुर पिंक पॅंथर्सने जोरदार चुरस दिसली.

त्याला तामिल थलाईवाजने 30 वरुन थेट 70 लाखांची बोली लावली. त्यानंतर तमिल थलाईजा यातुन बाहेर पडले. जयपुर पिंक पॅंथरचा मालक अभिषेक बच्चन मात्र त्याला संघात घेण्यासाठी जास्त उत्सुक दिसला.

दिपक गेल्या हंगामात पुणेरी पलटनचा कर्णधार होता. पहिले दोन हंगाम हा 24 वर्षांचा खेळाडू तेलुगु टायटन्स तर गेले तीन हंगाम तो पुणेरी पलटनकडून खेळत आहे.

2016मध्ये झालेल्या विश्वचषत विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. त्याने प्रो-कबड्डीमध्ये 81 सामन्यात 514 गुण घेतले आहेत तर63 टॅकल गुण घेतले आहेत. त्याच्याकडे जयपुरचा भावी कर्णधार म्हणुन पाहिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला

-अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया

संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली

आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!

या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!

तेव्हाच होईल महिलांची प्रो-कबड्डी पुन्हा सुरु!