बंगळूरु बुल्सच्या पवन सेहरावतचा प्रो कबड्डीत विक्रमांचा धमाका सुरुच

पुणे। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आज (26 नोव्हेंबर) 84 वा सामना बंगळुरु बुल्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात बंगळुरु बुल्सचा स्टार रेडर पवन सेहरावतने खास विक्रम केला आहे.

त्याने या प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात 150 रेड पॉइंट्स पूर्ण केल्या आहेत. प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात असा पराक्रम करणारा तो केवळ दुसराच कबड्डीपटू ठरला आहे. याआधी यू मुम्बाचा रेडर सिद्धार्थ देसाईने हा कारनामा केला आहे.

पवनने 6 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात खेळताना हा पराक्रम केला आहे. तसेच तो तसेच एकाच हंगामात 150 रेड पॉइंट्स मिळवणारा 13 खेळाडू ठरला आहे.

त्याने याआधीच प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात एकूण 150 पॉइंट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचे या सामन्याआधी 6 व्या मोसमात 13 सामन्यात एकूण 154 पॉइंट्स होते. तर रेडींगमध्ये 145 पॉइंट्स होते.

यापुर्वी एकाच मोसमात 150 किंवा त्यापेक्षा जास्त पॉइंट्स घेण्याची कामगिरी परदिप नरवाल (2017), रोहित कुमार (2017), अजय ठाकूर (2017), मोनू गोयत (2017), राहुल चौधरी (2017, 2014), मनिंदर सिंग (2017), दिपक हुडा (2017), नितीन तोमर (2017), अनुप कुमार (2014), सचिन (2017), रिशांक देवाडिगा (2017) आणि सिद्धार्थ देसाई (2018) यांनी केली आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

६६वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा यावर्षी कोकणातील रोह्यात?

१८ वर्षीय नवीन कुमारचा प्रो कबड्डीत विक्रमांचा विक्रम