महाराष्ट्र डर्बी: पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बामध्ये रंगणार प्रो-कबड्डीचा दुसरा सामना

आजपासून प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमाला चेन्नईमध्ये सुरुवात होणार आहे. या मोसमातील दुसरा सामना हा महाराष्ट्र डर्बीचा म्हणजेच यू मुम्बा आणि पुणेरी पलटन या दोन संघात रंगणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघांचा मोसमाची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल.

या दोन्ही संघांचे नेतृत्व बदलले आहे. त्यामुळे दोन्हीही संघाच्या कर्णधारांकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. पुणेरी पलटनचे नेतृत्व गिरीश एर्नाक करणार असून यू मुम्बाचे नेतृत्व फझल अत्रचली करणार आहे.

या खेळाडूंकडे असेल लक्ष-

गिरीश हा चांगला बचाबपटू जरी असला तरी ला नेतृत्वाचा फारसा अनुभव नाही त्यामुळे आता त्याला कर्णधार म्हणूनही स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. तसेच फझलने मात्र मागील मोसमातील दुसऱ्या सत्रात गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचे नेतृत्व केले आहे. परंतू या मोसमासाठी तो पुन्हा यू मुम्बाच्या संघात परतला आहे.

पुणेरी पलटनने त्यांचे मुख्य खेळाडू या मोसमात कायम केले आहेत. यात संदीप नरवाल, राजेश मोंडल आणि गिरीश एर्नाक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांच्या संघात मोनू, रिंकू नरवाल यांच्यासारखे युवा बचावपटूही आहेत. तसेच संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ पुण्याच्या संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

त्याचबरोबर अक्षय जाधव हा डू और डाय स्पेशालिस्टही पुण्याच्या संघात आहे. तसेच नितीन तोमरच्या संघात येण्याने संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे. तर दिपक कुमार दहियामुळे संघातील बचाव फळीत चांगला समतोल साधला जाईल.

यू मुम्बाच्या संघात फजल अत्रचली आणि धर्मराजन चेरलाथन हे कॉर्नर सांभाळतील. तसेच कव्हरला युवा सुरिंगर सिंग हा रोहित राणाबरोबर खेळेल. त्यामुळे त्यांची बचावफळीही मजबुत आहे.

यू मुम्बाची चढाईची फळीही चांगली असून यात अबोफजल मग्सोद्लोमहाली, आर श्रीराम, दर्शन काडियन आणि रोहित बालियान यांचा समावेश आहे. हे खेळाडू चांगली कामगिरी करुन संघातील मुख्य चढाईपटू होण्याचा प्रयत्न करतील.

आमने-सामने:

पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा हे दोन संघ आत्तापर्यंत 11 वेळा आमने सामने आले आहेत त्यातील 7 वेळा यू मुम्बाने बाजी मारली आहे. तर 4 वेळा पुणेरी पलटनने विजय मिळवला आहे.

प्रो कबड्डी- पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा सामन्याबद्दल सर्वकाही…

पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यात कधी होणार सामना?

पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना 7 आॅक्टोबर 2018 ला होणार आहे.

कोठे होईल पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना?

पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना जवाहरलाल नेहरु स्टेडीयम, चेन्नई येथे होणार आहे.

किती वाजता सुरु होईल पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.00 वाजता पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. 

पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना पाहता येणार आहे.

पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

hotstar.com या वेबसाईटवर पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांच्यातील सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल 7 जणांचा संघ-

पुणेरी पलटन- नितीन तोमर, विनोद कुमार, संजय श्रेष्ठ, परवेश, अक्षय जाधव, बजरंग, ताकामित्सू कोनो, संदीप नरवाल, राजेश मोंडल, मोरे जीबी, गिरीश एर्नाक(कर्णधार), विकास खत्री, रिंकू नरवाल, मोनू, अमित कुमार, रवी कुमार

यू मुम्बा- फझल अत्रचली(कर्णधार), धर्मराजन चेरलाथन, अभिषेक सिंग, सिद्धार्थ देसाई, विनोद कुमार, अबोफजल मग्सोद्लोमहाली, आर श्रीराम, रोहित बालियान, हादी ताजीक, अदिनाथ गवळी, इ सुभाष, सुरिंदर सिंग, शिव ओम, गौरव कुमार, मोहित बाल्यान, अनिल, अर्जून देशवल, दर्शन काडियन, राजागुरु सुब्रमनियम.

महत्वाच्या बातम्या-