प्रो कबड्डीच्या वेळापत्रकाच स्वरुप, जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीने

-अनिल भोईर

कबड्डी याखेळाने आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. जो खेळ मातीवरून मॅट पोहचला आहे. आज हा खेळ फक्त भारतापुरता मर्यादित राहील नसून तो इतर देशांमध्ये लोकप्रिय होत आहे. जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत इराणच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्णपदक जिंकून कबड्डीत नवीन क्रांती घडवून आणली आहे. भारतीय संघ जरी पराभूत झाला असला तरी कबड्डी आज जागतिक स्तरावर झपाट्याने वाढत आहे.

चार वर्षांपूर्वी प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली होती. प्रो कबड्डीमुळे कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढली आहे. या खेळला ग्लॅमर आलं आहे. मागील चार वर्षात प्रो कबड्डीची पाच पर्व झाली. पहिल्या चार पर्वात ८ संघांनी सहभाग घेतला होता पण पाचव्या पर्वात १२ संघांनी सहभाग घेतला. संघ, कालावधी, ठिकाणे व सामने यांचे आकडे पाहिले तर प्रो कबड्डी भारतातील सर्वात मोठी लीग ठरली आहे.

आपण सर्वांनी मागील पर्वात प्रो कबड्डीच स्वरूप बघितलं आहेच. त्याचप्रमाणे प्रो कबड्डी पर्व ६च स्वरूप असणार आहे. त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊ या.

प्रो कबड्डी पर्व ६ वेळापत्रकाच स्वरूप-
-किती संघ घेणार सहभाग:
प्रो कबड्डी पर्व-६मध्ये एकूण बारा संघ सहभाग घेणार असून प्रो कबड्डी सोडल्यास भारतात आजपर्यंत कोणत्याही खेळाच्या लीगमध्ये १२ संघांनी सहभाग घेतला नाही.

-स्पर्धेचा कालावधी:
प्रो कबड्डी पर्व ६ ही स्पर्धा ६ ऑक्टोबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ यादरम्यान तब्बल १३ आठवडे भारतातील १३ वेगवेगळ्या १३ शहरांमध्ये पार पडणार आहे. कालावधीचा विचार केल्यास देशातील सर्वात मोठी स्पर्धा आहे.

-झोन आणि झोनमधील संघ:
प्रो कबड्डी लीगमध्ये १२ संघ दोन झोनमध्ये खेळणार आहेत. ‘झोन A’ मध्ये भारतातील पश्चिम-उत्तर विभागातील सहा शहरातील संघ असणार आहेत. यामध्ये दबंग दिल्ली, गुजरात फार्च्यूनजाएंट्स, हरियाणा स्टीलरस, जयपूर पिंक पँथर, पुणेरी पलटण, यु मुंबा हे संघ असणार आहेत. तर ‘झोन B’ मध्ये भारतातील पूर्व-दक्षिण विभागातील सहा शहरातील संघ असणार आहेत. यामध्ये बंगाल वॉरियर्स, बंगळुरू बुल्स, पाटणा पायर्ट्स, तामीळ थालाईवस, तेलगू टायटन्स, यु.पी. योद्धा हे संघ असणार आहेत.

-सामने किती आणि कसे होणार:
प्रो कबड्डी पर्व ६ मध्ये एकूण १३८ सामने होणार असून त्याचं स्वरूप मागील पर्वाप्रमाणेच असणार आहे. पण त्यातील काही गोष्टी बद्दल अजूनही अनेक जणांना माहिती नाही. कोणता संघ कधी, कोणत्या संघ विरुद्ध खेळणार, किती सामने खेळणार हे प्रश्न पडतात. तर आता सोप्या पद्धतीने वेळापत्रकाच स्वरूपाबद्दल सर्व काही जाणून घेऊ.

झोन- एका झोनमध्ये एकूण सहा संघ असून झोनमधील प्रत्येक संघ आपल्या झोनमधील पाच संघानं विरुद्ध प्रत्येकी तीन सामने खेळणार आहे. (उदा. झोन A मधील यु मुंबा संघ झोन A मधील उर्वरित पाच संघानं विरुद्ध प्रत्येकी ३ सामने खेळणार आहे. म्हणजेच यु मुंबा आपल्या झोन मध्ये एकूण १५ सामने खेळणार आहे.) अश्या प्रकारे सर्व १२ संघ आपल्याला झोन मध्ये १५ सामने खेळणार आहे. झोन A आणि झोन B मध्ये प्रत्येकी ४५-४५ सामने होतील. दोन्ही झोनचे मिळवून एकूण ९० सामने होतील.

इंटर झोन चॅलेंज विक- इंटर झोन चॅलेंज म्हणजे आपल्या झोन व्यतिरिक्त दुसऱ्या झोन मधील संघानं विरुद्ध सामना खेळणं. १३ आठवड्या पैकी ६ आठवड्यात मध्ये प्रत्येकी सहा सामने हे इंटर झोन चॅलेंजचे असणार आहेत. यामध्ये आपल्या झोनमधील पाच संघानं व्यतिरिक्त दुसऱ्या झोन मधील संघानं विरुद्ध सामना खेळायचं आहे. प्रत्येक संघ विरुद्ध झोन मधील सर्व सहा संघाशी सामने खेळणार. ( उदा. झोन A मधील संघ यु मुंबा झोन B मधील सर्व सहा संघानं विरुद्ध प्रत्येकी १ सामना खेळेल.) अश्याप्रकारे इंटर झोन चॅलेंज विकमध्ये संघ खेळातील. इंटर झोन चॅलेंज विकमध्ये सहा आठवड्यात एकूण ३६ सामने होतील.

इंटर झोन वाइल्डकार्ड मॅच- वाइल्डकार्डमध्ये सहा सामने होतील. झोन A मधील सहा संघ विरुद्ध झोन B मधील सहा संघ असे सामने होतील. पण कोणता संघ कोणा विरुद्ध खेळणार हे नंतर लॉट्स पाडून ठरवलं जाईल (उदा. झोन A मधील यु मुंबा झोन B कोणत्यातरी एका संघा विरुद्ध वाइल्डकार्ड सामना खेळेल.) अशाप्रकारे सर्व संघाचा एक सामना म्हणजे एकूण सहा सामने होतील.

-प्लेऑफ – प्लेऑफ मध्ये एकूण सहा सामने होतील. त्यात २ सामने क्वालीफायर, ३ सामने एलिमिनेटर व अंतिम सामना असे होतील.झोन A व झोन B मधील टॉप तीन संघ प्लेऑफ साठी पात्र ठरतील.
-पहिला क्वालीफायर त्यामध्ये दोन्ही झोन टॉपचे संघ एकमेकांना विरुद्ध खेळतील. विजयी होणारा संघ थेट अंतिम फेरीत खेळेल तर पराभूत होणारा संघ दुसरा क्वालीफायर सामना खेळेल.
-एलिमिनेटर तीन सामने होतील त्यामध्ये पहिले दोन सामने हे (झोन A मधील दुसरा क्रमांकाचा संघ विरुद्ध झोन B मधील तिसऱ्या क्रमांकाच्या संघ) व (झोन A मधील तिसऱ्या क्रमांकाचा संघ विरुद्ध झोन B मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघ) असे होतील.
-एलिमिनेटर सामना क्रमांक १ व २ चा विजेत्यांमध्ये एलिमिनेटर सामना क्रमांक ३ होईल.
-दुसरा क्वालीफायर सामना हा पहिला क्वालीफायर सामना पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर सामना क्रमांक ३ चा विजेता यामध्ये होईल.
-अंतिम सामना क्वालीफायर १ विजेता विरुद्ध क्वालीफायर २ विजेता यांच्यात होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

एकेकाळी इंग्लंडमध्ये धावांसाठी महाग झालेला कोहली मोडणार द्रविड- गावसकरांचे विक्रम

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी