प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात असा मोठा पराक्रम करणारा सिद्धार्थ देसाई ठरला पहिला खेळाडू

पुणे। प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात शनिवारी (24 नोव्हेंबर) यू मुम्बा विरुद्ध दबंग दिल्ली संघात श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्लेक्स, बालेवाडी येथे पार पडला. या सामन्यात यू मुम्बाने सुरुवातीपासूनच दबंग दिल्लीवर वर्चस्व ठेवताना एकतर्फी 39-23 अशा फरकाने विजय मिळवला.

यू मुम्बाकडून सिद्धार्थ देसाईने 9 रेड पॉइंट्स मिळवले आहेत. याबरोबरच त्याने प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात 150 पॉइंट्स पूर्ण करण्याचाही टप्पा गाठला आहे. प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात 150 पॉइंट्सचा टप्पा गाठणारा तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे.

त्याने प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आत्तापर्यंत 14 सामने खेळले आहेत. या 14 सामन्यात त्याने 156 पॉइंट्स मिळवले असून त्यापैकी त्याने 153 पॉइंट्स रेडींगमधून मिळवले आहेत. त्यामुळे प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात 150 रेड पॉइंट्स पूर्ण कराणाराही तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे.

विशेष म्हणजे सिद्धार्थचा हा प्रो कबड्डीमधील पहिलाच मोसम आहे. त्यामुळे पदार्पणाच्या मोसमातच त्याने हा मोठा कारनामा केला आहे.

तसेच एकाच हंगामात 150 रेड पॉइंट्स मिळवणारा तो 12 खेळाडू ठरला आहे. यापुर्वी परदिप नरवाल (2017), रोहित कुमार (2017), अजय ठाकूर (2017), मोनू गोयत (2017), राहुल चौधरी (2017, 2016, 2014), मनिंदर सिंग (2017), दिपक हुडा (2017), नितीन तोमर (2017), अनुप कुमार (2014), सचिन (2017) आणि रिशांक देवाडिगा (2017) यांनी अशी कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पुणेरी पलटन पाठोपाठ यू मुम्बाचाही प्रो कबड्डीत खास विक्रम

प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा दीपक हुडा केवळ चौथा कबड्डीपटू

पवनकुमार शेरावतला आज प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी