प्रो कबड्डी: “?”

अनुप कुमारच्या डोक्यावरील बर्फ यंदा वितळेल?
फिनिक्स पक्षाप्रमाणे राकेश कुमार पुन्हा शून्यातून भरारी घेईल?
विश्व कप स्पर्धेप्रमाणे इकडेही ‘ठाकूर’ ‘अजय’ राहील?
प्रदीप नरवालच्या ‘डुबकी’ने पटना तरेल?
‘पोश्टर बॉय’ राहुल चौधरीला पोश्टर वरून कोणी हटवू शकेल?
सुरींदर आणि मोहित म्हणजेच जय आणि वीरू यांचे ‘शोले’ बघायला मिळतील की ते फक्त ‘रामगोपाल वर्मा की आग’ बनून राहतील?
काशिलिंग ‘हनुमान उडीने’ ‘यू मुम्बा’चा द्रोणागिरी उचलेल?
जसवीर पुन्हा जयपूरला विजयाचा ‘अभिषेक’ घालेल?
‘शिंदेंना’ जोडीला घेऊन दिल्लीचे तख्त राखेल का आपला ‘बाजीराव’?
कबड्डीच्या दिवाळीत पुण्याचा ‘दीपक’ उजळणार का?
संसदेपासून ते कबड्डीच्या मैदानापर्यंत ‘गुजरात’चाच आवाज घुमणार?
‘रिशांक’ करेल का ‘रिडम्पशन’ आपल्या ‘डू वर डाय’ टॅगचे?
‘बंगाल’ म्हणेल का ‘आमार शोणार ज्यांग कून ली’?
बेंगळुरूचे बुल्स नागपुरात थैमान घालतील की त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील?
सचिनचा कबड्डीला लागलेला हात खरंच ‘हॅन्ड ऑफ गॉड’ ठरेल?
कबड्डीचे वारकरी गाडतील का झेंडा प्रेक्षकरूपी पांडुरंगाच्या हृदयात?
आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या कबड्डीवर ‘यंदा असेल का आपलंच राज्य’?
सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील… उद्यापासून!!!

-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )