प्रो कबड्डी ७ लेग १: तेलगू टायटन्स विरुद्ध यु मुंबा लढत, सिद्धार्थ देसाईंकडे सर्वांच्या नजरा.

प्रो कबड्डी सीजन ७ ला उद्या पासून सुरुवात होत आहे. ७५ दिवस चालणाऱ्या या लीग मध्ये १३७ सामने होणार आहेत. प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये फॉरमॅट बदला असून आता सर्व संघ प्रत्येक संघा विरूध्द्व २ साखळी सामने खेळणार आहेत.

प्रो कबड्डी सीजन ७ ची सुरुवात हैद्राबाद पासून होईल. तेलगू टायटन्स संघाचा होम ग्राउंड गचीबोली इंडोर स्टेडियम, हैद्राबाद हे आहे. उद्या तेलगू टायटन्स विरुद्ध यु मुंबा यांच्यात सलामीची लढत होईल. सर्वांचे लक्ष हे सिद्धार्थ देसाई कडे असणार आहे. मागील हंगामात यु मुंबा कडून प्रो कबड्डीत पर्दापण केलेला सिद्धार्थ देसाई यंदा तेलगू टायटन्स कडून खेळणार आहे. सिद्धार्थ देसाई कडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. होम लेग मधील ४ सामन्यात चांगला प्रदर्शन करून सिद्ध्यर्थ देसाईला सुरवातीपासून टॉपला राहण्याची संधीअसेल.

तेलूगू टायटन्स आपल्या होम ग्राउंड वर ४ सामने खेळणार असून, पहिला सामना यु मुंबा, दुसरा सामना रविवारी तामिळ थालायवास विरुद्ध खेळेल. त्यानंतर दोन दिवसाच्या विश्रांती नंतर बुधवारी दबंग दिल्ली आणि शुक्रवारी पाटणा पायरेट्स विरुद्ध शेवटचा होम लेग सामना खेळेल.

तेलगू टायटन्स व्यतिरक्त आणखी ७ सामने हैद्राबाद लेग मध्ये होणार आहे. त्यात पहिल्यादिवशी २० जुलै ला पटना विरुद्ध गतविजेते बंगळुरू बुल्स असा सामना होईल. दुसऱ्या दिवशी बंगळुरू बुल्स विरुद्ध गतउपविजेते गुजरात याच्यात मुकाबला होईल. यु मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स , पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्तीलर्स अश्या लढती बघायला मिळतील.