महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

मुंबई | प्रो-कबड्डी लिलावात गुरुवारी महाराष्ट्राच्या विराज लांडगेला दबंग दिल्ली संघाने २५ लाख रुपये देत संघात घेतले.

त्याला एफबीएस कार्ड वापरत त्यांनी संघात कायम केले. लेफ्ट कवरला खेळत असलेला विराज ५व्या हंगामातही दिल्ली संघाकडून खेळला होता. त्यात त्याने १९ सामन्यात १६ गुण टॅकलमधून मिळवले होते.

२०१७-१८ हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तो ज्या संघाचा भाग होता त्या महाराष्ट्राच्या संघाने ६५व्या राष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली होती तर फेब्रूवारी महिन्यात मुंबईमध्ये झालेल्या फेडरेशन कपमध्ये हा संघ तिसऱ्या स्थानी राहिला होता.

२५ वर्षीय पुणेकर विराज B कॅटेगिरीमध्ये होता. त्याची बेस प्राईज १२ लाख रुपये होती.

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली