प्रो कबड्डी सीजन ६ ला उद्यापासून सुरुवात, चेन्नई लेग विषयी सर्व काही

-अनिल भोईर

देशातील दुसरी सर्वात मोठी लीग म्हणजे प्रो कबड्डी. कबड्डी खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रो कबड्डीने कबड्डी ला एक ओळख निर्माण करून दिली आहे. ७ ऑक्टोबर उद्यापासून प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाला सुरुवात होत आहे. ७५ दिवस चालणाऱ्या यास्पर्धेत १२ संघ सहभागी होत आहेत. देशातील १३ शहरात ही स्पर्धा खेळवली जाईल.

प्रो कबड्डी पर्व ६ ची सुरुवात चेन्नईला होणार आहे. चेन्नई हे तामिळ थालाईवस संघाचे होम ग्राउंड असणार आहे. चेन्नई लेग ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. पहिल्याच सामन्यात तामिळ थालाईवस समोर गतविजेते पाटणा पायर्ट्सचे आव्हान आहे. तर दुसरा सामना पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा याच्यात होईल.

दुसऱ्या दिवशी पुणेरी पलटण समोर सुरेंद्र नाडाच्या हरियाणा स्टीलर्सचे आव्हान असेल. तर तामिळ थालाईवस दुसरा सामना युपी योद्धा विरुद्ध खेळणार आहे.

तामिळ थालाईवस चेन्नई लेग मधील आपले उर्वरित तीन सामने तेलुगू टायटन्स, बेंगळुरू बुल्स तर शेवटचा सामना बंगाल वॉरियर्स विरुद्ध खेळणार आहे. अजय ठाकूर कडे तामिळ थालाईवस संघाचे नेतृत्व असणार आहे. चेन्नई लेगचे सर्व सामने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई येथे होतील.

चेन्नई लेगच्या सर्व सामन्याचे वेळापत्रक:

रविवार, ७ ऑक्टोबर २०१८
सामना ०१- तामिळ थालाईवस वि. पाटणा पायर्ट्स
सामना ०२- पुणेरी पलटण वि. यु मुंबा

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१८
सामना ०३- पुणेरी पलटण वि. हरियाणा स्टीलर्स
सामना ०४- तामिळ थालाईवस वि. युपी योद्धा

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१८
सामना ०५- दबंग दिल्ली वि. गुजरात फार्च्यूनजाएंट्स
सामना ०६- तामिळ थालाईवस वि. तेलुगू टाइटन्स

बुधवार, १० ऑक्टोबर २०१८
सामना ०७- यु मुंबा वि. जयपूर पिंक पँथर्स
सामना ०८- तामिळ थालाईवस वि. बेंगळुरू बुल्स

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१८
सामना ०९- जयपूर पिंक पँथर्स वि. दबंग दिल्ली
सामना १०- तामिळ थालाईवस वि. बंगला वॉरियर्स

महत्वाच्या बातम्या-

-टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी

-पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण

वाढदिवस विशेष: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?