प्रदीप नरवाल विरुद्ध गुजरात असाच काहीसा आजचा अंतिम सामना

चेन्नई । प्रो कबड्डी २०१७चा विजेतेपदाचा सामना आज पटणा पायरेट्स आणि गुजरात फॉरचूनजायन्टस संघात होणार आहे.

पटणा पायरेट्स संघाने या मोसमात २२ सामन्यांपैकी १० सामने जिंकले, ७ गमावले तर ५ सामने बरोबरीत सोडवले आहे. तसेच गुजरात फॉरचूनजायन्टस संघाने २२ सामन्यांपैकी १५ जिंकले, ४ गमावले तर ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत.

गुजरात फॉरचूनजायन्टस संघ हा या मोसमातील पहिल्या क्रमांकावरील संघ आहे तर पटणा पायरेट्स पाचव्या क्रमांकावरील संघ आहे. पटणा पायरेट्स संघाचा कर्णधार प्रदीप नरवालने स्वतःच्या कामगिरीवर संघाला एकहाती अंतिम सामन्यात आणले आहे.

पटणा पायरेट्स संघाचे प्रशिक्षक कबूल करतात की या मोसमात सुरवातीपासूनच संघावर खूप दबाव होता. तरीही आज संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. या संघाने मागील २ मोसमात प्रो कबड्डी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे पटना संघाला या मोसमात पुन्हा पुन्हा एकदा विजेतेपद जिंकून विजेतेपदाची हॅट्रिक करणारा पहिला संघ बनायची संधी आहे.

मागील ३ सामन्यात प्रदीप नरवालने २३, १९, १९ गुण मिळविले होते. हे ३ सामने खूपच चांगले झाले होते. पटणा पायरेट्स संघाचा अंतिम सामना पूर्णपणे संघाचा कर्णधार प्रदीप नरवालवर अवलंबून आहे. त्यामुळे गुजरात फॉरचूनजायन्टस संघाचे डिफेन्डर फजल अत्राचली आणि अभोझर मिघानी विरुद्ध रेडर प्रदीप नरवाल असाच काहीसा हा सामना रंगण्याची शक्यता आहे.