प्रो कबड्डी: पुणेरी मिसळ मुंबईच्या वडापाववर भारी

प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमाच्या सुरुवात एकदम धमाकेदार झाली. पहिला सामना तामिळ थालाईवाज आणि तेलगू टायटन्स या संघात झाला आणि राहुल चौधरीच्या दमदार कामगिरीवर तेलगू टायटन्सने सामना ३२-२७ अशा गुणफरकाने जिकला.

दुसरा सामना होता झोन A मधील पुणेरी पलटण आणि माजी विजेता यु मुंबा या संघामध्ये.यु मुंबाचा संघ त्यांच्या रेडरवर अवलंबून असणार हे लक्षात घेत हा सामना यु मुंबाचे रेडर विरुद्ध पुणेरी पलटणचे डिफेंडर असा होईल वाटले होते.

पण सामना सुरु झाला आणि पहिली रेड जरी पुणेरी पलटणने केली असली तरी पहिला गुण अनुपने यु मुंबाची रेड आल्यावर केला. एवढेच काय ते यु मुंबासाठी चांगले झाले.

त्यानंतर सामन्याची सारी सूत्रे पुणेरी पलटणकडे संघाकडे आली आणि यु मुंबा ऑल आऊट झाली. त्यानंतर अखेरपर्यंत सामन्यात परत येण्यात यु मुंबा संघाला जमलेच नाही.

दुसऱ्या हाफमध्येही यु मुंबा गुण मिळवण्यात अपयशी ठरत होती, त्यामुळे त्यांनी काशीलिंग अडकेला रिप्लेस करून नितीन मदनेला संधी दिली पण याही महाराष्ट्रीयन खेळाडूची जादू रेडींगमध्ये काळ चालली नाही.

अनुपने एकट्याने रिडींग आणि डिफेन्समध्ये चांगली कामगिरी केली. मुंबाचा संघ शेवटच्या काही मिनिटात सामन्यात परतण्याच्या नेहमी यशस्वी होते पण दुसऱ्या हाफमध्ये दीपक हुड्डाच्या सुपर रेडमुळे यु मुंबा परत ऑल आऊट झाल्याने त्यांना या सामन्यात परत येणे जमले नाही आणि यु मुंबाच्या डिफेन्समधील उणीवा सगळ्या समोर आल्या.

मागील मोसमातील यु मुंबा आणि पुणेरी पलटणमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पुण्याने बाजी मारली होती आणि आज देखील त्यांनी त्याची पुनरावृत्ती झाली आणि पुण्याने सामना ३३-२१ अशा फरकाने जिंकला.