प्रो कबड्डी: पहा कोणत्या झोनमध्ये असेल कोणता संघ

प्रो कबड्डीचा ५वा मोसम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या मोसमात प्रत्येक संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी २१ सामने खेळणार आहे. या मोसमात १२ संघ असल्याने या संघांची दोन गटात विभागणी केली आहे. ते दोन गट म्हणजे झोन A आणि झोन B. कबड्डी संघांना प्रथम आपल्या झोनमधील सामने खेळावे लागतील आणि नंतर ते इंटर झोनल सामने खेळतील. त्यानंतरच्या गुणांवरून प्ले ऑफचे सामने ठरतील.

झोन A
१ पुणेरी पलटण
२ हरयाणा स्टीलर्स
३ जयपूर पिंक पँथर
४ दबंग दिल्ली
५ गुजरात फॉर्चुनजाएंट्स
६ यु मुंबा

झोन B
१ तेलगू टायटन्स
२ तमील थालयवाज
३ बेंगाल वॉरियर्स
४ पाटणा पायरेट्स
५ यु पी योद्धाज
६ बेंगलूरु बुल्स