प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमाची तारीख घोषित

गेले दोन दिवस दिल्ली येथे सुरु असलेल्या प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील लिलावानंतर काल प्रो कबड्डीच्या मोसमाची पहिली तारीख घोषित करण्यात आली. प्रो कबड्डीचा पाचवा मोसम शुक्रवार, दिनांक २८ जुलै २०१७ रोजी सुरु होणार आहे.

कबड्डी चाहते या मोसमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय खेळ इतिहासातील सर्वात मोठा क्रीडा मोसम म्हणून याकडे पहिले जाणार आहे. १३ आठवडे चालणाऱ्या या मोसमात तब्बल १२ संघ सहभागी होत असून ११ राज्यांत स्पर्धा खेळवली जाईल. एकूण १३० सामने या स्पर्धेत होणार असून अंदाजे ३५० खेळाडू या स्पर्धेत खेळातील.