रोमहर्षक सामन्यात दिल्ली दबंगने केली पुणेरी पलटणवर मात

प्रो कबड्डी सिझन 6  मध्ये रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. काल (12 आॅक्टोबर) झालेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली दंबग संघाने पुणेरी पलटनवर 41-37 असा विजय मिळवला.

दिल्लीच्या संघाने सांघिक कामगिरीचे प्रदर्शन घडवत विजय संपादन केला. आपल्या मजबुत डिफेन्सच्या बळावर दिल्लीच्या संघाच्या संघाने ही दबंग कामगिरी केली.

दिल्लीच्या संघातील प्रत्येक खेळाडूने पाॅईंट्स कमावले. नवीन कुमार आणि चंद्रन रणजित या दोघांनी दिल्ली कडून सर्वात जास्त रेड पाॅईंट्स मिळवले. विशाल मानेने 5 टॅकल पाॅईंट्स मिळवले.

पुणेरी पलटन संघाचा रेडर नितीन तोमरने जबरदस्त कामगिरी करत 23 रेडमधे तब्बल 20 पाॅईंट्स मिळवले. संघातील इतर खेळाडूंनी केलेल्या हाराकिरीमुळे पुणेरी पलटनला थोडक्यात पराभव स्विकारावा लागला.

पुणेरी पलटणची सुरुवात धमाकेदार झाली. नितीन तोमरने आपल्या पहिल्याच रेड मध्ये पाॅईंट मिळवत पलटणला चांगली सुरुवात करून दिली होती.

नितीन तोमरच्या तीन यशस्वी रेडनंतर 5-11 अश्या पिछाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणने 11-13 अशी उसळी घेतली.

मध्यांतराच्या वेळी तर पुणेरी पलटणने 22-20 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर दिल्लीच्या संघाने आत्मविश्वासाने खेळत सामना आपल्या नावावर केला.

आज (13 आॅक्टोबर) ला रात्री 8 वाजता हारयाना स्टीलर्स आणि यू मुंबा यांच्यात सामना रंगणार आहे. दुसरा सामना तेलगू टाइटन्स आणि युपी योद्धा यांच्यात 9 वाजल्यापासून रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या-