प्रो कबड्डीच्या तारखा ठरल्या, जाणुन घ्या ६व्या हंगामाबद्दल सर्वकाही…

आयपीएलनंतर भारतात ज्या लीगची सर्वांना उत्सुकता असते त्या प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाची तारीख घोषीत झाली आहे. १९ आॅक्टोबरपासून हा हंगाम सुरु होणार असून २० जानेवारीला अंतिम सामना होणार आहे.

भारतीय कबड्डी महासंघाकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ५व्या हंगामाप्रमाणेच हा हंगाम असणार आहे.

महासंघाकडून जरी या लीगच्या तारखा घोषीत झाल्या असल्या तरी फेडरेशन कप आणि राष्ट्रीय स्पर्धेचे वेळापत्रक मात्र घोषीत झाले नाही.

यावर्षी नव्याने लिलाव झाले आहेत. त्यात आता लिगची तारखा घोषीत झाल्यामुळे संघांना सरावासाठी तसेच संघ बांधणीसाठी वेळ मिळणार आहे.

यावेळी प्रथमच प्रो कबड्डीमध्ये खेळाडूंना १ कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली. मोनु गोयात, राहुल चौधरी, दिपक निवास हुडा, नितीन तोमर, रिशांक देवाडीगा आणि फैजल अत्राचली हे ६ खेळाडू करोडपती झाले. यातील सर्व भारतीय खेळाडू नुकत्याच झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत खेळले तसेच एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचही निवडले गेले आहेत.

त्यात यावर्षी एशियन गेम्स होत असल्यामुळे देशात कबड्डीसाठी मोठे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे प्रो कबड्डीचा ६वा हंगाम हा आजपर्यंतचा सर्वात हिट हंगाम ठरणार असल्याचे अंदाज आतापासूनच बांधले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आहे जगातील सर्वात स्फोटक खेळाडू परंतू फलंदाजीत केला नकोसा विक्रम

सलग ७ वनडे मालिकांत ७ शतके करणारा रोहित शर्मा जगातील एकमेव खेळाडू

या वर्षी पहिल्या ६ महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा करणारे ४ खेळाडू

आता मास्टर ब्लास्टर, किंग कोहली आणि हिटमॅनच्या नावावर आहे हा खास विक्रम

भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..