कर्णधारांच्या हस्ते झाले प्रो कबड्डीच्या ट्रॉफीचे आनावरण

रविवारी 7 आॅक्टोबरपासून प्रो कबड्डी लीग 2018 ला सुरुवात होणार आहे. हा प्रो कबड्डीचा सहावा मोसम आहे. या प्रो कबड्डीच्या ट्रॉफीचे शुक्रवारी(5 आॅक्टोबर) चेन्नईमध्ये 12 संघांच्या खेळाडूंच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी सुनील कुमार, सुरजीत सिंग, जोगिंदर सिंग नरवाल, सुरेंद्र नाडा, अनुप कुमार, परदीप नरवाल, गिरीश एर्नाक, विशाल भारद्वाज, रिशांक देवाडिगा आणि धर्मराज चेरलाथन हे 12 संघांचे खेळाडू उपस्थित होते.

गतविजेत्या पटना पायरेट्स संघाचा कर्णधार परदीप नरवाल या सोहळ्यादरम्यान सांगितले की तो यावेळीही तो खेळताना डुबकीचा वापर करणे सोडणार नाही. तसेच तो म्हणाला प्रतिस्पर्ध्यांना लढत देण्यासाठी त्याने अनेक रणनीती आखल्या आहेत.

त्याचबरोबर पटनासाठी अव्हानात्मक कोणता संघ असेल याविषयी बोलताना तो म्हणाला, “पटना पायरेट्ससाठी, आव्हानात्मक संघांपैकी आम्ही पुणेरी पलटनला समजतो. कारण त्यांचा बचाव मजबूत आहे. मी या मोसमात ही ट्रॉफी पुन्हा एकदा जिंकेल.”

प्रो कबड्डीचा हा सहावा मोसम 7 आॅक्टोबर 2018 ते 5 जानेवारी 2019 पर्यंत असणार आहे. एवढ्या मोठ्या कालावधी बद्दल यूपी योद्धाचा कर्णधार रिशांक देवाडीगा म्हणाला, जेव्हा या स्पर्धेचा कालावधी लहान होता तेव्हा दुखापतींच्या संधी अधिक असतात. खेळाडूंना सलग दिवशी सामने खेळायला लागायचे.

तसेच तो पुढे म्हणाला, या मोठ्या कालावधीच्या स्वरुपात आव्हानासह फिटनेसमधील सातत्यही कायम ठेवता येते.

या मोसमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक स्टार सेलिब्रेटींची उपस्थिती असणार आहेत. ज्यात खेळाच्या क्षेत्रातील मान्यवर आणि चित्रपटसृष्टीतील सेलिंब्रेटींचा समावेश असेल.

पहिलाच सामना तमिळ थलायवाज आणि पटना पायरेट्स यांच्यात होणार असल्याने या सामन्यात श्रृती हसन आणि विजय सेथूपथी हे त्यांच्या आवडत्या संघाला प्रोत्साहन देताना दिसतील.

या मोसमातील प्ले आॅफचे सामने कोचीला तर अंतिम सामना मुंबईमध्ये 5 जानेवारी 2018 ला पार पडेल.

तमिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूर त्यांच्या संघाबद्दल म्हणाला, मागील वर्षी संघात खूप तरुण खेळाडू होते. पण यावर्षी आमच्याकडे परिपूर्ण संघ आहे. तसेच त्याने सांगितले की या संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.

महत्वाच्या बातम्या-

-टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी

-पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण

वाढदिवस विशेष: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?