उद्या प्रो-कबड्डी लिलावात होणार १ कोटींचा ऐतिहासिक आकडा पार?

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे.

यावेळी प्रथमच एखाद्या खेळाडू १ कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रो-कबड्डीच्या ५व्या मोसमात युपी योद्धाजने नितीन तोमरला ९३ लाख रुपयांना संघात घेतले होते. तर चौथ्या मोसमात मोहीत चिल्लरला तब्बल ५३ लाखांची बोली लागली होती.

यावेळी खेळाडूंची बेस प्राईस अर्थात मुळ रक्कम २० लाख, १२ लाख, ८ लाख आणि ५ लाख ठेवण्यात आली आहे.

त्यात “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” या राष्ट्रीय प्रतिभा शोध कार्यक्रमातील खेळाडूंना ६.६ लाख ही रक्कम देण्यात येणार आहे.

फ्रंचायझी १८ ते २५ खेळाडूंना आपल्या संघात स्थान देऊ शकतात. त्यात कमीतकमी दोन आणि   जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडूंना घेऊ शकतात. तर “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” या राष्ट्रीय प्रतिभा शोध कार्यक्रमातील जास्तीत जास्त ३ खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतात.

एक फ्रंचायझी जास्तीत जास्त ४ कोटी रुपये खर्च करु शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

उद्या सुरु होणाऱ्या प्रो-कबड्डी लिलावापुर्वी ह्या ५ गोष्टी नक्की माहित करुन घ्या!

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड

महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली

संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध

आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम

कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम