प्रो कबड्डी लीग- ५: खेळाडूंचा लिलाव, बजेट आणि खेळाडूंच्या श्रेणी…

प्रो कबड्डी लीगच्या ५व्या मोसमाचा लिलाव सोमवारी दिल्ली येथे होणार आहे. ३५० खेळाडू या निवड प्रक्रियेत भाग घेणार असून त्यात राष्ट्रीय, राज्य तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

या मोसमात एकूण १२ संघ असून त्यातील ४ संघ हे प्रथमच प्रो कबड्डीमध्ये भाग घेत आहे. ७ संघानी त्यांचा एक खेळाडू कायम ठेवण्याचे ठरवले आहेत. जयपूर पिंक पॅन्थरने त्यांचा एकही खेळाडू कायम न ठेवण्याचं ठरवलं आहे. खेळाडूंचा हा लिलाव दोन दिवस अर्थात २२ आणि २३ मे रोजी सुरु राहणार आहे.

लिलावाचे काही नियम

खेळाडूंच्या श्रेणी
एलिट खेळाडू किंवा प्राधान्य दिलेले खेळाडू (श्रेणी अ, ब किंवा क )
लिलाव पूल खेळाडू (देशांतर्गत- अ, ब, क आणि परदेशी अ, ब, क ) (श्रेणी अ, ब किंवा क )
नवीन खेळाडू (NYP ) (लिलावानंतर राहणारे खेळाडू हे ड श्रेणीत)

..

खेळाडूंना दिली जाणारी रक्कम
एलिट खेळाडू किंवा प्राधान्य दिलेले खेळाडू (मूलभूत किंमत)
अ- ३५ लाख
ब- २० लाख
क- १२ लाख

लिलाव पूल खेळाडू (मूलभूत किंमत)
अ- २० लाख
ब- १२ लाख
क- ०८ लाख
ड- ०५ लाख
नवीन खेळाडू (NYP ) (लिलावानंतर राहणारे खेळाडू हे ड श्रेणीत) – ०६ लाख

संघ बांधणी करतानाचे नियम
-संघ १८-२५ खेळाडू संघात घेऊ शकतात.
-संघ एलिट खेळाडू किंवा प्राधान्य दिलेले खेळाडूपैकी एक खेळाडू कायम ठेवू शकतो.
-संघ नवीन खेळाडूंपैकी फक्त ३ खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो.
-संघात २-४ परदेशी खेळाडू असावेत. कमीतकमी २ खेळाडू असावेत.

प्रत्येक संघाला खेळाडूंच्या लिलावाला ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करता येणार नाहीत.