कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक

चेन्नई | प्रो-कबड्डीचा केवळ दुसऱ्या हंगामात भाग घेत असलेल्या तमिल थलाइवाजने मुख्य प्रशिक्षकपदी ई भास्करन यांची निवड केली आहे.

गेल्या मोसमात ज्यांनी ही जबाबदारी सांभाळली ते के.भास्करन हे आता या संघाच्या तांत्रिक विभागात प्रमुख म्हणून काम पहाणार आहेत. ते तळागाळातून नविन प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी या संघासोबत काम करणार आहेत. 

यु-मुंबाचे प्रशिक्षक राहिलेल्या ई. भास्करन यांच्या दोन दशकातील अनुभवाचा या संघाला आता फायदा होताना दिसणार आहे. त्यांच्याच प्रशिक्षक पदाखाली यु-मुंबाने लीगचे विजेतेपद जिंकले होते. त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक पदही सांभाळले आहे. 

या महिन्याच्या सुरूवातीलाच तमिल थलाइवाजने अजय ठाकूर, अमित हूडा आणि सी. अरूण या खेळाडूंना संघात कायम केले आहे. त्यामूळे तमिल थलाइवाज या मोसमात पुर्ण तयारीने उतरण्याचा इरादा दिसत आहे.