८ शाळांमधून निवडला जाणार पुण्यातील कबड्डी जुनिअर्स (केबीडी) चा विजेता

0 275

१५ ऑक्टोबर २०१७: शाळांमध्ये कबड्डीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशातील १२ शहरांमध्ये जिथे प्रो कबड्डीच्या मतचेस होत आहेत त्या सर्व शहरांमध्ये कबड्डी जुनिअर्सचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी जुनिअर्स हि स्पर्धा आता अंतिम टप्प्यात अली असून पुण्यातील सामने आज बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडले.

पुण्यातील ८ सर्वोत्तम शाळांच्या कबड्डी संघांमध्ये हे सामने पार पडले. लेक्सिकोन इंटरनॅशनल स्कुल, कल्याणी नगर, बिशप्स स्कुल, आर्मी पब्लिक स्कुल, लॉयला हायस्कुल, एमइएस बॉयसस्कुल, डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल , सेलम हायस्कुल, विद्यानिकेतन या शाळांमध्ये कबड्डीचे सामने पार पडले आणि त्यास मुलांच्या पालकांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल आणि बिशप्स स्कुल तसेच विद्यानिकेतन आणि एमइएस बॉयस स्कुल दरम्यान उपांत्य फेरीचे सामने रंगले.

बिशप्स स्कुल आणि विद्यानिकेतन यांमध्ये कबड्डी जुनिअर्सची अंतिम फेरी होणार असून १६ ऑक्टोबर ला संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्यांचे स्टार स्पोर्ट्सवर प्रसारण होणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: