प्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाच्या तारखांची घोषणा

0 894

भारतीय खेळ जगतात ज्या लीगची मोठी चर्चा होते त्या प्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाची घोषणा आज करण्यात आली. ६व्या मोसमाची सुरुवात १९ ऑक्टोबर २०१८ रोजी होणार असून ती १३ आठवडे चालणार आहे.

६व्या मोसमाची रचना ही ५व्या मोसमासारखीच असणार आहे. तर केवळ ६महिन्यात पुढची अर्थात ७वा मोसम सुरु होणार आहे.

५व्या मोसमात संघाची संख्या ८ वरून १२ करण्यात आली होती. या मोसमात तब्बल १३८ सामने झाले होते. १३ महिने ही स्पर्धा चालली होती. याप्रमाणेच ६व्या आणि ७व्या मोसमाची रचना असणार आहे.

प्रो कबड्डी ही क्रिकेटेतर खेळांमधील सर्वात लोकप्रिय लीग आहे. त्यामुळे कबड्डीप्रेमीं याची मोठी आतुरतेने वाट पाहत असतात. आजच्या घोषणेमुळे आज पुन्हा या लीगची मोठी उत्सुकता कबड्डीप्रेमींना लागली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: