प्रो-कबड्डीच्या लिलावात खेळाडू मालामाल

0 70

प्रो-कबड्डीचा ५ वा सिझन किती रंगतदार आणि जोरदार होणार याची झलक आज लिलावातच पहायला मिळाली. यामध्ये नवीन खेळाडूंनी अनुभवी खेळाडूंवर बाजी मारत कबड्डीमधील बदलावाचे संकेत दिले.
आजच्या लिलावातमध्ये सर्वात महगडा खेळाडू ठरले तो भारताचा खेळाडू आणि कबड्डी विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा नितीन तोमर. नितीन तोमरसाठी सर्वाधिक ९३ लाखांची बोली लागली आणि त्याला उत्तर प्रदेश संघाने आपल्याकडे घेतले.
भारतीय संघाचा उद्याचा अनूप कुमार समजल्या जाणाऱ्या रोहित कुमारसाठी दुसऱ्या क्रमांकाची बोली लागली आणि विशेष म्हणजे बेसिक प्राइज़ २० लाख असताना त्याची बोली थेट ५० लाखपासून सुरू झाली. त्याला बेंगळुरू बूल्ल्स संघाने ८१ लाखांना विकत घेतला.
आजचा दिवस संपला त्यावेळी हे खेळाडू ठरले ऑक्शन मध्ये स्टार.

 

हे ५ खेळाडू ठरले सर्वात महागडे:


१. नितीन तोमर ९३ लाख
 संघ – उत्तर प्रदेश 

 

२. रोहित कुमार ८१ लाख
संघ – बेंगलूरू बुल्ल्स
३. मंजीत चिल्लर ७५.५ लाख
संघ – हरियाणा स्टीलर्स
४. के.सील्वामनी ७३ लाख
संघ -जयपूर पिंक पँथर्स
५. सुर्जित सिंग ७३ लाख
संघ – बंगाल वॉरियर्स

Comments
Loading...
%d bloggers like this: