- Advertisement -

प्रो कबड्डी: यु मुंबा’चा संभाव्य संघ

0 102

प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणजे यु मुंबा. प्रो कबड्डीच्या पहिल्या तिन्ही मोसमात सलग तीन वेळेस अंतिम फेरी गाठणारा हा संघ आहे. हा संघ जसा खेळतो तसा या स्पर्धेचा खेळण्याचा ट्रेंड बदलत असतो. मागील मोसमात यु मुंबा संघाला त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी साधता आली नव्हती. पण या मोसमात यु मुंबा परत अंतिम सामान्यपर्यंत पोहचेल असे वाटते आहे.

यु मुंबाची ताकद त्यांचे रेडर आहेत. यु मुंबाकडे स्पर्धेतील सर्वात यशस्वी दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचे रेडर आहेत जे यु मुंबाची खरी ताकद आहेत. यु मुंबाकडे कॅप्टन कुल अनुप कुमार तर होताच पण या स्पर्धेतील सर्वात यशस्वी दुसऱ्या क्रमांकाचा रेडर महाराष्ट्राचा काशीलिंग आडके देखील आहे. काशीलिंगला या वर्षी मुंबाने करारबद्ध केले आहे. यु मुंबा संघाकडे आणखी दोन महत्वपूर्ण रेडर आहेत ते म्हणजे शब्बीर बापू आणि नितीन मदने.

मुंबा संघाकडे कुलदीप सिंगच्या रूपाने ऑलराऊंडर खेळाडू आहे जो रेडींग आणि डिफेन्समध्येही संघाला जिंकवून देऊ शकतो. डिफेन्समध्ये मुंबा संघाकडे हादी ओश्तोराक हा इराणी खेळाडू आहे.  यंदाच्या मोसमात यु मुंबाची पूर्ण  मदार ही त्यांच्या रेडींग डिपार्टमेंटवर अवलंबून असेल.

असा असेल यु मुंबाचा संभाव्य संघ-
१ अनुप कुमार -(कर्णधार)रेडर
२ शब्बीर बापू-रेडर
३ काशीलिंग आडके -रेडर
४ नितीन मदने -रेडर
५ कुलदीप सिंग -ऑलराऊंडर
६ हादी ओश्तोराक -राइट कॉर्नर
७ जोगिंदर नरवाल -लेफ्ट कॉर्नर

Comments
Loading...
%d bloggers like this: