तर वनडेत आज झाल्या असत्या एकाच डावात तब्बत ७३३ धावा

0 365

आज विंडीज विरुद्ध नेदरलॅंड सामन्यात नानेफेक जिंकणाऱ्या नेदरलॅंडने विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. २०१९ क्रिकेट विश्वचषकाची ही पात्रता स्पर्धा सध्या हरारे येथे सुरू आहे. 

आज जेव्हा विंडीजकडून ख्रीस गेल आणि इवीन लेवीस या खेळाडूंनी सलामीला येत धूव्वादार फलंदाजी केली तेव्हा हा संघ एक मोठी धावसंख्या उभारेल असेच चित्र होते. परंतू नंतर पावसामूळे आलेल्या व्यत्ययामुळे विंडीजने ४८ षटकांत ६ बाद ३०९ धावा केल्या. 

हा सामना सुरू झाला तेव्हा ख्रीस गेल आणि इवीन लेवीस हे अशी काही फटकेबाजी करत होते की त्यांनी ४.३ षटकांत चक्क ६६ धावा केल्या होत्या. त्यावेळी विंडीजची सरासरी ही १४.६७ होती. 

यावेळी स्क्रिनवर जेव्हा प्रोजेक्टेड धावसंख्या दाखवण्यात आली होती ७३३. याचा अर्थ जर विंडीजने जर अशीच फलंदाजी ५०व्या षटकापर्यंत केली असती तर ते एवढी धावसंख्या उभारू शकत होते. 

प्रोजेक्टेड धावसंख्या म्हणजे काय?

प्रोजेक्टेड धावसंख्या वेगवेगळया सरासरीचा निर्धारीत केलेल्या षटकांबरोबर गुणाकार करुन वर्तवली जाते. सरासरी म्हणून यात सध्याची सरासरी, १०, ८ अाणि ६ हे अाकडे घेतले जातात.

 

 

 

 

 

 

Comments
Loading...
%d bloggers like this: