असे ५ अंडर १७ भारतीय खेळाडू जे भारतीय क्लबमधून खेळू शकतात

भारतात होत असलेल्या विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर पडला आहे. परंतु या विश्वचषकाने अंडर १७ खेळाडूंना ओळख आणि प्रसिद्धी मिळवून देण्याचे खूप मोठे काम या क्रिकेटवेड्या देशात केले.

युरोपात खेळाडू आपल्या व्यावसायिक फुटबॉलची सुरुवात १७-१८व्या वर्षांपासून करतात हे आपण जाणतो परंतु भारतात या प्रक्रियेबद्दल कमालीची उदासीनता आहे. भारतात खूप कमी खेळाडूंना १७-१८ व्या वर्षी एखाद्या मोठ्या क्लबसाठी करारबद्ध केले जाते आणि खेळवले जाते.

अंडर १७ विश्वचषकामुळे भारतीय संघातील काही खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. अनेक खेळाडूंना युरोपात जाऊन सराव करण्याची संधी मिळाली आणि त्यातून खूप शिकता आले.

भारतातीलच नव्हे तर युरोपातील क्लब देखील भारतीय खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी आतुरलेले आपणास दिसत आहेत. आज आपण चर्चा करू अश्या ५ अंडर १७ भारतीय खेळाडूंची जे भारतातील मोठ्या क्लबसोबत जोडले जाऊ शकतात.

# मोहम्मद राकीप –
भारतीय अंडर १७ संघाचे प्रशिक्षक लुईस नॉरटन डी मॅटोस यांनी रकीपला एकाही सामन्यात भारतीय संघात स्थान दिले नाही. तरी देखील रकीपकडे उच्यकोटीचा सेन्टर बॅक म्हणुन पाहिले जाते. सध्या एआयएफएफमध्ये (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन) प्रशिक्षण घेत असणाऱ्या रकीपसाठी इंडियन सुपर लीगमधील संघ केरला ब्लास्टर्स यांनी प्रस्ताव पाठवला आहे.

रकीपसमोर एआयएफएफचा देखील पाच वर्षाचा प्रस्ताव आहे. परंतु ब्लास्टर्सचा प्रस्ताव एआयएफएफच्या तीन पटीने जास्त आहे. रकीपने जर केरला ब्लास्टर्सच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली तर त्याला महिन्याला १.५ लाख रुपये मिळतील.

#४ अमरजित सिंग कियाम
भारतीय अंडर १७ संघाचा कर्णधार अमरजित हा उत्तम बॉक्स टू बॉक्स मिडफिल्डर आहे. भारतीय संघाचा हा प्लेमेकर खेळाडू प्रत्येक सामन्यात गोलच्या संधी निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. अमरजितसाठी केरला ब्लास्टर्स प्रतिवर्ष १५ लाख रुपये मोजण्यात तयार आहे. त्यामुळे अमरजित हा केरला ब्लास्टर्सकडून पुढील मोसमात खेळताना आपणास दिसू शकतो.

#३ कोमल थाटाल-
विश्वचषक स्पर्धेपूर्वी युरोपीय दौऱ्यात या खेळाडूने कमालीचे प्रदर्शन केले आहोत. तेव्हापासुनच युरोपातील मोठे क्लब या खेळाडूच्या कामगिरीकडे लक्ष ठेऊन होते. ड्रीम क्लब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मँचेस्टर युनाइटेड संघाने त्याच्या खेळाचे निरक्षण करण्यास खास एक गट पाठवला होता.

भारताच्या पहिल्या सामन्यात अमेरिका विरुद्ध जेव्हा-जेव्हा कोमलकडे बॉल आला तेव्हा त्याच्या आक्रमक चाली दर्शनीय होत्या. अमेरिकेच्या डिफेंडर्सला चुकवण्यात तो अनेकदा यशस्वी झाला परंतु गोल करण्यात त्याला अपयश आले.

त्याचे मँचेस्टर युनिटेडसाठी युनिटेडसाठी खेळणे सध्यातरी थोडी दूरची गोष्ट वाटते. इंडियन सुपर लीमधील संघ दिल्ली डायनॅमो यांनी घोषणा केली होती की ते थाटालला संघात घेण्यासंबधी सकारात्मक आहेत. थाटालसाठी हा खूप चांगला पर्याय आहे.

#२ जितेंद्र सिंग – भारतीय अंडर १७ संघातील मुख्य डिफेंडर जितेंद्र सिंग यांच्याकडे मोठा खेळाडू होण्याच्या सर्व क्षमता आहेत. आय लीगमधील क्लब मोहन बागान आणि ईस्ट बेंगाल हे संघ त्याला करारबद्ध करण्यास उत्सुक आहे.

जितेंद्र हा अंडर १७ संघाचा खूप महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या प्रगतीकडे एआयएफएफ आणि भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टंटाईन हे बारकाईने लक्ष देऊन आहेत.

#१ धीरज सिंग मोईरंगथेम
भारतीय अंडर १७ संघाचा गोलकीपर आणि विश्वचषकातील उत्तम कामगिरीमुळे ‘इंडियन स्पायडर कीड‘ म्हणून धीरज ओळखला जाऊ लागला आहे. धीराजने ३ सामन्यात १६ वेळा गोल थांबवले आहेत.

धीरज अनेक क्लबच्या संपर्कात आहे ज्यात युरोपीय क्लब देखील आहेत. परंतु त्याच्यासमोर दोन मोठे पर्याय आहेत. एक म्हणजे एआयएफएफ आय- लीग ११ आणि दुसरा म्हणजे केरला ब्लास्टर्स. केरला ब्लास्टर्स धीराजसाठी १८ लाख रुपये प्रतिवर्ष मोजण्यास तयार आहे. जर हा करार झाला तर धीरज सर्वाधिक मानधन घेणारा १७ वर्षांखालील खेळाडू बनेल.