आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाची घसरण

 

आयसीसीने आज जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारतीय संघाची घसरण झाली असून भारतीय संघ ताज्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर गेला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेणारा दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा या क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला ४-१ असे पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी आला होता तर कसोटी क्रमवारीत संघ आधीपासूनच अव्वल स्थानी होता.

आफ्रिकेच्या संघाच्या नावावर सध्या ६,२४४ पॉईंट्स असून त्यांचे रेटिंग आहे १२०. तर भारतीय संघाचे पॉईंट्स आहेत ५९९३ आणि रेटिंग दक्षिण आफ्रिका संघाएवढेच आहे.

जर भारतीय संघ न्यूजीलँडविरुद्धची वनडे मालिका जिंकला तर पुन्हा अव्वल स्थानी येऊ शकतो.