पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पृथा वर्टीकर हिला दुहेरी मुकुट 

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यतपद टेबल टेनिस स्पर्धेत नभा किरकोळे, नील मुळ्ये, राधिका सकपाळ,अनय कोवेलमुडी, रामानुज जाधव  व पृथा वर्टीकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मिडजेट मुलींच्या गटात अव्वल मानांकीत नभा किरकोळेने दुस-या मानांकीत रुचीता दरवटकरचा  11/5, 11/9,12/10  असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.

आठ वर्षीय नभा सिटी इंटरनॅशनल स्कुल, कोथरूड येथे चौथ्या इयत्तेत शिकत असून या वर्षातील तिचे हे चौथे विजेतेपद आहे. नभा सिंबायोसीस स्पोर्टस् सेंटर येथे निरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांच्या गटात तिस-या मानांकीत रामानुज जाधवने अव्वल मानांकीत स्वरूप भाडळकरचा 12-10, 11-3, 11-4   असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

9 वर्षीय रामानुज हा बिशप्स शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक मार्तंड बिनिवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. 

12 वर्षाखालील कॅडेट मुलांच्या गटात अव्वल मानांकीत नील मुळ्येने आपल्या लौकाकाला साजेसा खेळ करत तिस-या मानांकीत वेदांग जोशीचा 6/11,11/4,11/7,11/8,11/4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात चौथ्या मानांकीत राधिका सकपाळने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत तिस-या मानांकीत साक्षी पवारचा 11/9, 11/7, 11/6, 11/7 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

15वर्षाखालील सब-ज्युनियर मुलींच्या गटात दुस-या मानांकीत पृथा वर्टीकरने पाचव्या मानांकीत राधिका सकपाळचा 15-13, 11-2, 11-8, 11-8, 11-8 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील तीचे हे दुसरे विजेतेपद आहे. 18 वर्षाखालील मुलींच्या गटात स्वप्नाली नराळेला नमवत विजेतेपद पटकावले.

पृथा पीईएस मॉडर्न हायस्कुल येथे सातव्या इयत्तेत शिकत असून पृथाचे हे या वर्षातील तिसरे विजेतेपद आहे. ती रेडीयन्स स्पोर्टस् अकादमी येथे रोहीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांच्या गटात चौथ्या मानांकीत अनय कोवेलमुडीने दुस-या मानांकीत नील मुळ्येचा 11-5, 7-11, 11-3, 11-4, 11-5 पराभव करत विजेतेपद पटकावले.

अनय हा इंदिरा इंटरनॅशनल स्कुल येथे आठवी इयत्तेत शिकत असून सिंबायोसीस स्पोर्टस सेंटर येेथे प्रशिक्षक निरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे.

12 वर्षाखालील कॅडेट मुलांच्या गटात अव्वल मानांकीत नील मुळ्येने तिस-या मानांकीत वेदांग जोशीचा 6/11,11/4,11/7,11/8,11/4  असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 11वर्षीय नील हा मिलेनियम शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

त्याचे या वर्षातील या गटातील हे तिसरे विजेतेपद असून नागपूर व नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. मुलींच्या गटात चौथ्या मानांकीत राधिका सकपाळने तिस-या मानांकीत साक्षी पवारचा 11/9, 11/7, 11/6, 11/7 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

10 वर्षाखालील मिडजेट मुले- उपांत्य फेरी

स्वरूप भाडळकर(1) वि.वि आदित्य सामंत (4) 15/13,11/6,11/6

रामानुज जाधव(3) वि.वि अभिराज सपकाळ(2) 7/11,7/11,11/5,11/6,11/7

अंतिम फेरी- रामानुज जाधव वि.वि स्वरूप भाडळकर(1)  12-10, 11-3, 11-4

10 वर्षाखालील मिडजेट मुली- उपांत्य फेरी

नभा किरकोळे(1) वि.वि तनया अभ्यांकर (4) 11/7,11/1,13/15,11/7

रुचीता दरवटकर(2) वि.वि नाइशा रेवसकर (3) 9/11,11/6,8/11,  11/2,11/3

अंतिम फेरी- नभा किरकोळे(1) वि.वि रुचीता दरवटकर (2) 11/5, 11/9,12/10

कॅडेट मुले(12 वर्षाखालील)गट: उपांत्य फेरी:
नील मुळ्ये(1)वि.वि.प्रणव घोलकर(4) 11/4,11/2,11/5,11/5
वेदांग जोशी(3)वि.वि.दक्ष जाधव(6) 11/9,11/6,11/9,11/9
अंतिम फेरी: नील मुळ्ये(1)वि.वि. वेदांग जोशी(3)6/11,11/4,11/7,11/8,11/4

कॅडेट मुली (12 वर्षाखालील)गट: उपांत्य फेरी:
राधिका सकपाळ(4)वि.वि.देवयानी कुलकर्णी(1)9/11,11/4,11/8,11/5,8/11,11/5
साक्षी पवार(3)वि.वि.आनंदिता लुनावत11/5,13/11,11/9,12/10
अंतिम फेरी: राधिका सकपाळ(4)वि.वि. साक्षी पवार(3)11/9, 11/7, 11/6, 11/7

सब-ज्युनियर मुली(15वर्षाखालील)गट: उपांत्य फेरी: 
राधिका सकपाळ(5)वि.वि.अनिहा डिसुझा(1)11/8,8/11,12/10,11/9,11/5
पृथा वर्टीकर(2)वि.वि.मृण्मयी रायखेलकर(3)7/11,11/5,11/4,14/12,9/11,11/8
अंतिम फेरी- पृथा वर्टीकर(2)वि.वि राधिका सकपाळ(5) 15-13, 11-2, 11-8, 11-8, 11-8

सब-ज्युनियर मुले(15वर्षाखालील)गट: उपांत्य फेरी: 

अनय कोवेलमुडी(4)वि.वि.अर्चन आपटे(1)11/5,11/6,11/3,10/12,17/15

नील मुळ्ये(2)वि.वि.आदी फ्रॅंक अगरवाल(3)11/9,6/11,12/10,11/6,7/11,2/11,11/6

अंतिम फेरी- अनय कोवेलमुडी(4)वि.वि. नील मुळ्ये(2) 11-5, 7-11, 11-3, 11-4, 11-5

पुरूष एकेरी गट- उप-उपांत्यपुर्व फेरी

श्रीयश भोसले(16) वि.वि सनत बोकील(1) 8/11,8/11,11/9,11/8,11/9

करण कुकरेजा(15) वि.वि वैभव दहिभाते(2) 4/11,9/11,11/5,11/3, 11/9

शुभम पहाडे वि.वि चिन्मय गायकवाड 4/11,16/14,11/6, 6/11,11/9

कृपाळ देशपांडे वि.वि यश देवळेकर 5/11,11/6,11/7,11/9

गौरव लोहापात्रे वि.वि रौनक आपटे 11/7,5/11,11/5,11/4

रिषभ सावंत(3) वि.वि आर्यन पानसे (14) 10/12, 8/11, 11/7,1 2/10,11/2

आदर्श गोपाळ(10) वि.वि रजत कदम(6) 11/6,11/6,11/8

अव्दैत ब्रम्हे(11) वि.वि धनंजय बर्वे(8) 11/9,10/12,7/11, 11/7,14/12

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश

विराट कोहलीचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या विक्रमालाही धक्का