पीएसआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल करंडक टेनिस स्पर्धेत 100हून अधिक खेळाडूंचा सहभाग

पुणे | ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे  व पीएमडीटीएच्या मान्यतेखाली पीएसआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल 10 वर्षाखालील करंडक टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र पोलिस मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजन टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे दि.6 व 7 सप्टेंबर 2018 या कालावधीत रंगणार आहे. 
स्पर्धा संचालक मारूती राऊत म्हणाले की, स्पर्धेत 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात 100हुन आधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेसाठी सुपरवायझर म्हणुन प्रविण झिटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी  पारितोषिके देण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-