केरळसाठी पाकिस्तान सुपर लीगमधील संघमालकाची मदत

पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) पेशावर जालमी संघमालक जावेद अफ्रिदीने केरळमधील महापूरग्रस्तांसाठी ५००० तंबू आणि प्राथमिक औषधोपचाराची मदत केली आहे.

“पाकिस्तानमध्ये सध्या वातावरण चांगले आहे. पण मागील काही दिवसांपासून केरळमधील स्थिती ऐकून दु:ख झाले. यासाठी मला पेशावर झालमी संघाकडून मदत करायला आवडेल”, असे ट्वीट अफ्रिदी यांनी केले.

आतापर्यंत केरळमध्ये जवळपास ३७० लोकांचा जीव गेला आहे. १९२४ नंतर पहिल्यांदाच तेथे एवढी मोठी पुरस्थिती निर्माण झाली. तसेच भारतीय क्रिकेटर संजू सॅमसननेही १५ लाखांची मदत केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास

विराट कोहलीने गांगुलीला टाकले मागे, धोनीचा विक्रम धोक्यात