कोणालाही आवडणार नाही असा विक्रम करणारा पुजारा ठरला आठवा भारतीय

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचा आज(4 जानेवारी) दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या सत्रातपर्यंत भारताने पहिल्या डावात 6 बाद 491 धावा केल्या आहेत.

भारताच्या या डावात आज चेतेश्वर पुजाराने 373 चेंडूत 193 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 22 चौकार मारले. मात्र तो द्विशतक करण्यापासून फक्त 7 धावांनी वंचित राहिला. त्याला 130 व्या षटकात नॅथन लायनने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले.

त्यामुळे तो कसोटीमध्ये 190-199 या धावांदरम्यान बाद होणारा एकूण आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी बुधी कुंदेरन, मोहम्मद अरुद्दीन, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, केएल राहुल, आणि शिखर धवन हे फलंदाज कसोटीमध्ये 190-199 या धावांदरम्यान बाद झाले आहेत.

यातील अझरुद्दीन, द्रविड आणि तेंडुलकर हे तीघांनी प्रत्येकी दोन वेळा कसोटीमध्ये 190-199 या दरम्यान धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये 190- 199 धावांदरम्यान कसोटीमध्ये बाद होणारे सेहवाग आणि पुजारा हे दोनच भारतीय खेळाडू आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 90-99 आणि 190- 199 धावांदरम्यान बाद होणारे सेहवाग आणि पुजारा हे दोनच भारतीय फलंदाज आहेत.

या सामन्यात पुजाराने मयंक बरोबर 116 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली तर हनुमा विहारीबरोबर पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली.

कसोटीमध्ये 190-199 या दरम्यान धावा करणारे भारतीय फलंदाज – 

192 – बुधी कुंदेरन (1964)

199, 192 – मोहम्मद अझरुद्दीन (1086, 1990)

190, 191 – राहुल द्रविड (1999, 2010)

193, 194* – सचिन तेंडुलकर (2002, 2004)

195 – विरेंद्र सेहवाग (2003)

199 – केएल राहुल (2016)

190 – शिखर धवन (2017)

193 – चेतेश्वर पुजारा (2019)

महत्त्वाच्या बातम्या:

दिडशतकी खेळीनंतरही असा नकोसा विक्रम करणारा चेतेश्वर पुजारा दुसरा भारतीय

या कारणामुळे सिडनी कसोटीत भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बांधली हाताला काळी पट्टी

एकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी