….आणि शतकवीर पुजाराला हेल्मेट बदलावे लागले!

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात 27 धावांनी आघाडी घेतली आहे.

भारताने पहिल्या डावात सर्वबाद २७३ धावा केल्या. यातील १३२ धावा एकट्या चेतेश्वर पुजाराने केल्या. तळातील फलंदाजांना हाताशी धरुन पुजाराने जबरदस्त कामगिरी केली.

काल अन्य फलंदाज धावा करण्यासाठी झगडत असताना पुजाराने मात्र भारतासाठी मोठी खेळी केली. त्यात सुरुवातीला पुजारालाही काही चेंडू खेळणे कठीण गेले.

बेन स्टोक्सचा एक उसळता चेंडू तर पुजाराच्या हेल्मटेवर आदळला. यावेळी ज्या ठिकाणी हा चेंडू आदळला त्याच ठिकाणी हेल्मेट फुगले होते. यामुळे पुजाराने त बदलुन घेतले. यावेळी स्टोक्सने पुजाराजवळ येत त्याची विचारपूस केली.

५१व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुजाराबरोबर ही घटना घडली. हा उसळता चेंडू पुजाराने हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने जोरात बॅट फिरवली. परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि बाॅल हेल्मेटवर आदळला.

यावेळी टीम इंडियाचे पिजीओ आणि राखीव खेळाडू लगेच मैदानावर धावले. तसेच पुजाराची विचारपूस करत सर्व ठीक असल्याचे विचारले. त्यानंतर पुजाराने लगेच हेल्मेट बदलले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत २५ हजार चेंडू टाकणारे गोलंदाज

– टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत १० हजार चेंडू खेळणारे भारतीय फलंदाज

-वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी या भारतीय क्रिकेटपटूने घेतली क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्ती

 २९ चेंडूत ० धावा…. रिषभ पंतचा अजब कारनामा

 असे झाले कसोटीत ६ हजार धावा करणाऱ्या विराटचे हाॅटेलवर स्वागत