विराट-शिखरच्या मैत्रीसाठी पुजाराचा बळी

बर्मिंगहॅम। भारत-इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला आज (१ ऑगस्ट) बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर सुरवात झाली आहे.

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात भारतीय संघातून भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळून त्याच्या जागी केएल राहुलला स्थान देण्यात आहे.

तर सराव सामन्यात दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनला देखील अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले आहे.

चेतेश्वर पुजाराला संघातून वगळल्याबद्दल अनेक क्रिकेट जानकारांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

तसेच रवि शास्त्री आणि विराट कोहलीच्या या निर्णयाला विरोध करत अनेक भारतीय चाहत्यांनी त्यांना ट्विटरवर धारेवर धरत ट्रोल केले आहे.

तसेच एका चाहत्याने विराटसोबतच्या मैत्रीमुळेच धवनला संघात स्थान मिळाले आहे असे ट्विट केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू

टीम इंडीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया