चेतेश्वर पुजाराकडून ३३ वर्षातील मोठा विक्रम

कोलकाता । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराकडून उद्या मोठा विक्रम होऊ शकतो. तो कसोटीच्या पाचही दिवस फलंदाजी करणारा भारताचा केवळ तिसरा खेळाडू होऊ शकतो. 

या कसोटीत पुजाराने पहिले चार दिवस फलंदाजी केली आहे. तसेच आज तो ९ चेंडूत नाबाद २ धावा करून परत गेला आहे. उद्या तो जेव्हा मैदानावर फलंदाजीला येईल तेव्हा तो त्याचा या कसोटीमधील ५वा दिवस ठरेल. 

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो ८ धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी तो ४७ धावांवर नाबाद राहिला. तिसऱ्या दिवशी तो ५२ धावांवर बाद झाला. तर आज तो २ धावांवर खेळत आहे. 

यापूर्वी भारताकडून १९८४ साली याच मैदानावर भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री इंग्लंडविरुद्ध नाबाद राहिले होते. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये केवळ ८ फलंदाजांना हा कारनामा करता आला आहे. 

त्यात बॉयकॉट, फ्लिंटॉफसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.