केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सिध्दांत बांठिया, जयेश पुंगलीया, सिधार्थ रावत यांचा दुस-या पात्रता फेरीत प्रवेश

पुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सिध्दांत बांठिया, जयेश पुंगलीया, सिधार्थ रावत, एन. विजय सुंदर प्रशांत, चंद्रील सुद, रणजीत विरल मुरुगेसन, लक्षीत सुद यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुस-या पात्रता फेरीत प्रवेश केला.  

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीतभारताच्या सिध्दांत बांठियाने सिध्दार्थ विश्वकर्माचा  7-6, 6-1 असा पराभव करत दुस-या पात्रता फेरीत प्रवेश केला. भारताच्या पाचव्या मानांकीत सिधार्थ रावतने ध्रुव सुनीशचा  6-4, 7-6 असा पराभव केला. सातव्या मानांकीत एन. विजय सुंदर प्रशांत याने अन्वित बेंद्रेचा 6-4, 6-2 असा पराभव केला. तर भारताच्या चंद्रील सुदने सरबीयाच्या मिलान राडोझोकोवीक याचा 6-1, 7-5

असा पराभव करत दुसरी पात्रता फेरी गाठली.

चौथ्या मानांकीत फ्रांसच्या हुगो ग्रेनिअरने कझाकस्तानच्या अॅलेक्सा काद्रुकचा 6-1,6-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलीयाच्या अॅलेक्सी पोप्रीन याने भारताच्या विनायक शर्मा काझाचा 6-3, 7-5 असा तर रशियाच्या शाल्वा झानाशीयाने भारताच्या अभिनव शानमुगमचा 6-2, 6-4 असा पराभव करत दुस-या पात्रता फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी

हुगो ग्रेनिअर(फ्रांस,4) वि.वि अॅलेक्सा काद्रुक(कझाकस्तान) 6-1,6-1

सिधार्थ रावत(भारत, 5) वि.वि (वाइल्ड कार्ड) ध्रुव सुनीश(भारत) 6-4, 7-6

तिमुर खाबिबुलीन(कझाकस्तान) वि.वि नाओकी नाकागावा(जपान, 6) 2-6, 7-6, 6-4

एन. विजय सुंदर प्रशांत(भारत,7) वि.वि अन्वित बेंद्रे(भारत) 6-4, 6-2

अॅलेक्सी पोप्रीन(8, ऑस्ट्रेलीया) वि.वि विनायक शर्मा काझा(भारत) 6-3, 7-5

चंद्रील सुद(भारत) वि.वि मिलान राडोझोकोवीक(सरबीया) 6-1, 7-5

रणजीत विरल मुरुगेसन(भारत) वि.वि(वाइल्ड कार्ड) अरमान भाटीया(भारत) 6-0, 6-3

बोर्ना गोजो वि.वि इवान सबानो 6-3, 6-3

(वाइल्ड कार्ड) सिध्दांत बांठिया(भारत) वि.वि सिध्दार्थ विश्वकर्मा(भारत) 7-6, 6-1

(वाइल्ड कार्ड) जयेश पुंगलीया(भारत) वि.वि (वाइल्ड कार्ड) दक्षिणेश्वर सुरेश(भारत) 4-6, 6-4, 6-3

लक्षीत सुद(भारत) वि.वि (वाइल्ड कार्ड) प्रसन्न बागडे(भारत) 6-1, 6-1

मतेज सबानो वि.वि सुरज आर.प्रबोध(भारत) 7-5, 2-6, 6-4

शाल्वा झानाशीया(रशिया) वि.वि अभिनव शानमुगम(भारत) 6-2, 6-4