पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सेलर्स, जॅग्वॉर्स संघाचे विजय

पुणे:  सेलर्स, जॅग्वॉर्स या संघांनी पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. जेट सिंथेसायझर, मदर्स रेसिपी आणि जितेंद्र्र घडोक ग्रुप हे या स्पधेर्चे मुख्य प्रायोजक आहेत.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सेलर्स संघाने आॅल स्टार संघावर १८ धावांनी मात केली. सेलर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांत ५ बाद ६४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आॅल स्टार संघाला ४ बाद ४६ धावाच करता आल्या.
यानंतर जॅग्वॉर्स संघाने मॅक्सिमम मॉंव्हरिक्स संघावर १२ धावांनी विजय मिळवला. जॅग्वॉर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ७० धावा केल्या. यात गौरव राणाने १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सिमम संघाला १ बाद ५८ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक – १) सेलर्स – ६ षटकांत ५ बाद ६४ (सुमिरन मेहता ३५, मल्हार गाणला १९, हिरेन परमार २-४, रोहित आचार्य १-७) वि. वि. आॅल स्टार – ६ षटकांत ४ बाद ४६ (रोहित आचार्य २४, राजेश कासट ३-८, हर्ष चव्हाण १-४).
२) जॅग्वॉर्स – ६ षटकांत ४ बाद ७० (गौरव राणा २९, शहान पटेल १६, खलीद परवानी १-४) वि. वि. मॅक्सिमम मॉंव्हरिक्स – ६ षटकांत १ बाद ५८ (खलीद परवानी नाबाद २८, जयदीप पटवर्धन २२).
३) टायफून्स – ६ षटकांत ३ बाद ७१ (विमल हंसराज ३६, अश्विन शहा ११, श्रेयश गरमपल्ली १-१०) वि. वि. जेट्स – ६ षटकांत २ बाद ७० (पुनीत सामंत नाबाद ३३, रोझेबेह भारदा २६, हर्षवर्धन पाटील १-८).
४) ईगल्स – ६ षटकांत ३ बाद ३७ (रुद्र शिंदे १४, आशुतोष आगाशे १२, आर्यमन पिल्ले १-३, अर्षत अक्कलोटकर १-३) पराभूत वि. द किंग्ज – ३.४ षटकांत २ बाद ३८ (मिहीर बोरावके नाबाद १२, उमेश पिल्ले नाबाद १०, रुद्र शिंदे २-३).
५) व्हेव्ज – ६ षटकांत ३ बाद ७७ (प्रकाश कारिया ४४, अमित कामत १०, रोहित जाधव १-८) वि. वि. टायगर्स – ६ षटकांत ५ बाद ४९ (प्रितम लुणावत १९, अमित कामत ४-२).
६) वॉरियर्स – ६ षटकांत ५ बाद ५० (आरव विज १४, कपिल सरीन ११, अमिताभ अगरवाल २-४, सुरज राठी २-६) पराभूत वि. लायन्स – ५.४ षटकांत २ बाद ५३ (तुषार असवानी नाबाद २८, हर्षवर्धन पाटील नाबाद १४, ए. पूनावाला १-७, कुणाल अगरवाल १-१०).