पुणे: सायक्लोथॉन 2018ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

पुणे | ज्ञानसागर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, सी एम इंटरनॅशनल स्कुल, ज्ञानसागर आर्टस अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, बालेवाडी व रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या महिला दिनाचे औचित्य साधुन रविवार दि. 11 मार्च रोजी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले.
ही सायक्लोथॉन सर्व वयोगटांसाठी खुली होती. या सायक्लोथॉनमध्ये 5 वर्ष वयोगटातील मुला-मुलींपासुन ते 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांनीही उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या सायक्लोथॉनमध्ये 250 पेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये महिलांचाही ​​सहभाग उल्लेखनीय होता.
बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पसपासून सायक्लोथॉनला डीआयएमआर चे संचालक डॉ.साजिद अल्वी,सीएमआयएसच्या प्राचार्या सौ.रूपाली ढमढेरे व रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉ.रविंद्र नलावडे,डॉ.जितेंद्र हुडे, श्री.सत्यजीत उमर्जीकर व इतर मान्यवरांनी झेंडा दाखवुन सायक्लोथॉनला सुरूवात केली.
या उपक्रमामध्ये 5 कि.मी., 8 कि.मी. व 15 कि.मी चे तीन मार्ग होते. समारोपप्रसंगी श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्री.गणपतराव बालवडकर, संचालक डॉ.साजिद अल्वी, सौ. रूपाली ढमढेरे, डॉ. रविंद्र नलावडे, डॉ.जितेंद्र हुडे व श्री. सत्यजीत उमर्जीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक वितरीत करण्यात आले. अशी माहिती आयोजक प्रा. समीर पाटील यांनी दिली.