पुणे मॉन्सून अश्वशर्यती हंगाम २०१९: उत्तम मॉन्सून ट्रॅकमुळे भरघोस प्रतिसादाचा विश्वास- झिनीया लॉयर

पुणे। पुणे अश्वशर्यती हंगामासाठी तयार करण्यात आलेला यंदाचा ट्रॅक अतिशय उत्तम दर्जाचा असून हा खास मॉन्सून ट्रॅक असल्यामुळे पावसातही यावर सर्व शर्यती सुरु राहणार आहे, असा विश्वास आरडब्लूआयटीसी समितीच्या विपणन विभागाच्या मुख्य झिनीया लॉयर यांनी व्यक्त केला.

पुणे अश्वशर्यतींच्या यंदाच्या मौसमात पारंपरिक व दरवर्षीच्या सर्व शर्यती यंदाही चालू राहणार असून त्यात नवीन शर्यतींची भर घालण्यात आलेली नाही.असे सांगून त्या म्हणाल्या कि, सोशल मिडीयामुळे यावेळेच्या मौसमात भरघोस प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसत आहे.

तसेच सोशल मिडियामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर अश्वशर्यतींकडे खेचला गेला आहे. उपस्थितीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून युवकांसाठी 3 वर्ष वयाच्या घोड्यांचा ग्रुप 1 हा वेगळा गटही तयार करण्यात आला आहे. या गटालाही युवकांचा प्रतिसाद मिळेल अशी आमची खात्री आहे.

या मौसमाच्या क्लासिक दर्जाच्या शर्यतींसाठी सर्व केंद्रामधून रेस शौकीन पुण्यात येणार असल्याचे सांगून लॉयर म्हणाल्या कि, रविवारच्या विशेष शर्यतींसाठी पुणेकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, असे आम्हांला वाटते.