पुणे मॉन्सून अश्वशर्यती हंगाम २०१९: आयरन एज, टरमेरिक टॉवर यांचे पहिल्या दिवसावर वर्चस्व

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यती 2019 या स्पर्धेस आयरन एज, टरमेरिक टॉवर या घोडयांनी आजच्या महत्वाच्या प्रतिष्ठेच्या शर्यतींमध्ये अव्वल क्रमांक पटकावताना आजचा दिवस गाजवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी) येथे आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी द गॅम्बल फॉर लव्ह ट्रॉफी क्लास-I या महत्वाच्या शर्यतीत मंजिरी हॉर्स ब्रीडर्स फार्म प्रायव्हेट लिमिटेडच्या मिस्टर व मिसेस शापुर पी. मिस्त्री आणि डिटी रेसिंग अँड ब्रीडर्स एलएलपीच्या डी.आर.ठाकेर आणि विक्रम शहा व एस.आर.सनस यांच्या मालकीच्या आयरन एज या घोड्याने विजेतेपद पटकावले. याचा पी. त्रेवोर हा जॉकी होता आणि इम्तियाज सैत हा ट्रेनर होता.

दुसऱ्या महत्वाच्या लढतीत द डी के आशिष ट्रॉफी टर्मस या शर्यतीत व्हीएस झाईया थ्रोफब्रेड रेसिंग अँड ब्रिडींग प्रायव्हेट लिमिटेडच्या विजय शहा व पूजा शहा, अभय भुतडा यांच्या मालकीच्या टरमेरिक टॉवर या या घोड्याने अव्वल क्रमांक पटकावला. यामध्ये पी. त्रेवोर हा जॉकी होता आणि नरेंद्र लगड हा ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:
1. द बियॉन्ड एक्सपेक्टेशन प्लेट डिव्हिजन-II
विजेता: रोमँटिक आईज, उपविजेता: आऊटस्टँडिंग

2. द बियॉन्ड एक्सपेक्टेशन प्लेट डिव्हिजन-I
विजेता: स्कायसर्फर, उपविजेता: मॅजेस्टिकल

3. ड डबल बुल प्लेट क्लास-III
विजेता: बुशटॉप्स, उपविजेता: फ्लुएर दि लाईज

4. द गॅम्बल फॉर लव्ह ट्रॉफी क्लास-I
विजेता: आयरन एज, उपविजेता: एक्सलेंट गोल्ड

5. द सेवेरियानो प्लेट क्लास IV
विजेता: सॉल्टबे, उपविजेता: क्वीन्स गेट

6. द डी के आशिष ट्रॉफी टर्मस
विजेता: टरमेरिक टॉवर, उपविजेता: सिफर

7. द सिजन ओपनर प्लेट क्लास IV
विजेता: हेल्स बेल्स, उपविजेता: फिलाडेल्फिया.