आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गोळवलकर प्रशालेची ज्ञानाकुंरवर मात

पुणे | मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशालेने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे मनपा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटात पी. डी. ई. एज. इआॅन ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलवर ५० धावांनी मात केली.
बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या पहिल्या लढतीत गोळवलकर प्रशालाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत २ बाद १०० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ज्ञानांकुर स्कूलला १० षटकांत ७ बाद ५० धावाच करता आल्या. यात अनिश पाष्टेने चार गडी बाद केले.

अपूर्व पंडितचे ४ बळी

वरद जोशीच्या नाबाद ८६ धावा आणि अपर्व पंडितच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर संघाने राजा धनराजगिरजी हायस्कूल संघावर १४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. परांजपे विद्यामंदिरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत बिनबाद १६७ धावा केल्या. यानंतर राजा धनराजगिरजी हायस्कूलला ९.५ षटकांत २२ धावांत रोखले. यात अपूर्वने ४, तर शुभम मोरेने तीन गडी बाद केले.

७ वर्षांखालील मुले – निकाल –१) मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशाला – १० षटकांत २ बाद १०० (दुर्वेश टांकसाळे नाबाद १६, हेरंब वैशंपायन नाबाद १८, नागेंद्र चिपकर १-८, पवन ननावरे १-१३) वि. वि. ज्ञानांकुर स्कूल – १० षटकांत ७ बाद ५० (दिनेश मौर्य नाबाद १२, अनिश पाष्टे ४-९).

२) भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर -१० षटकांत बिनबाद १६७ (वरद जोशी नाबाद ८६, हर्षल क्षीरसागर नाबाद १९) वि. वि. राजा धनराजगिरजी हायस्कूल – ९.५ षटकांत सर्वबाद २२ (करण कांबळे १०, अपर्व पंडित ४-१, शुभम मोरे ३-०).

३) किलबिल स्कूल – १० षटकांत ३ बाद १०२ (प्रथमेश पवार नाबाद २२, ओम घडशी २१, यश चौधरी १-१७) वि. वि. व्हिक्टोरियस कीड्स एज्युकेशन – १० षटकांत ५ बाद ५८ (सिद्धार्थ जगताप ८, शिवराज कोकाटे ५, तेजस पवार २-६).

४) बिशप्स स्कूल कॅम्प – १० षटकांत ३ बाद ७७ (रिषभ पारेख २३, कौशल तांबे १४, नागेश पालदे १-१३, आशिष ससाणे १-१४) बरोबरी वि. म. ए. सो. भावे स्कूल – १० षटकांत २ बाद ७७ (आशिष ससाणे नाबाद ४४). सुपर ओव्हरमध्ये बिशप्स स्कूल एका धावेनी विजयी.