तीन दिवसीय सुपरक्रॉस पुणेकरांना थक्क करण्यास सज्ज

पुणे|  पुणे इन्व्हिटेशनल  सुपरक्रॉस लीग 2017 च्या चौथ्या आवृत्तीत अव्वल मानांसाठी सात संघ, 11 आंतरराष्ट्रीय रायडर्स आणि 53 भारतीय रायडर्स झुंजणार असून ही स्पर्धा  रॉयल पाम्स, मुंढवा, पुणे येथे 17 ते 19नोव्हेंबर 2017 या दरम्यान होणार आहेत.

तीन दिवसांच्या घडामोडींनी भरलेल्या रेसिंग स्पर्धा ठरणारी ही स्पर्धा क्रीडारसिकांना नक्कीच खिळवून ठेवेल कारण अव्वल रायडर्स यात आपली कौशल्ये दाखवतील आणि एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतील.

सुरूवातीला सर्वांच्या नजरा विद्यमान विजेते भल्ला रॉयल आणि त्यांच्या रायडर्सवर असतील. यात श्रेष्ठ आणि प्रतिभावान रायडर हरित नोआ हाही सक्रिय असेल. अरान्हा रेसिंगचा भाग असताना तो 2014च्या आवृत्तीत अजिंक्य ठरला होता. हरित हा आता नवीन प्रवेश करणाऱ्या इंक रेसिंगचा भाग आहे. 

तसेच श्रीलंकेचा इशान दसनायके याच्यावरही लक्ष ठेवावे लागेल, तो भारतीय सुपरक्रॉस रेसिंगचा नियमित भाग आहे.स्थानिक मुलगा ऋग्वेद बारगुजे हा स्थानिक चाहत्यांच्या दृष्टीकोनातून प्रमुख आकर्षण असेल, कारण राष्ट्रीय सर्किटमध्ये अलीकडे त्याचा चांगलाच गाजावाजा आहे.

 तसेच खचाखच भरलेल्या प्रेक्षकांच्या समोर आपल्या धाडसी कौशल्यांचे प्रदर्शन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रायडर्सची उपस्थिती विसरणे शक्य नाही. परदेशी रायडर्स हे अमेरिका, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि जर्मनीहून आले आहेत.

ज्युनिअर्स प्रकारातील स्पर्धा ही या वर्षीचे महत्त्वाचे आकर्षण असल्याचे म्हटले जाते. यात पुण्याचा युवराज कोंढे, करण कार्ले, इक्षान शानभाग आणि सार्थक चव्हाण अशा तरुण व प्रतिभावंत रायडरची रेस असेल. या मुलांमध्ये साताऱ्याची तानिका शानभाग ही मुलगीही असेल.

मोटोक्रॉस रेसिंगसह यावेळी दररोज दुपारी फ्रिस्टाईल मोटोक्रॉस शो, फूड स्टॉल, संगीत, उत्पादन लाँच, प्रदर्शन, विविध सादरीकरण आणि आणि अर्थातच सुपरकॉल्स मॉडेल्स असतील. या अॅक्शन-पॅक इव्हेंटमध्ये काही उत्कृष्ट ब्रँड, कलाकार आणि रेसर्सही हजर असतील.

या स्पर्धेबद्दल बोलताना व्हिलो इव्हेंट्सचे इव्हेंट डायरेक्टर आणि पार्टनर ईशान लोखंडे म्हणाले, “या लीगने दरवर्षी उत्साह वाढविला असून अनेक आश्चर्ये पुढे आणली आहेत. नवीन स्वरूप, नवीन टीम्स आणि नवीनरायडर्ससह ही लीग नक्कीच रोमांचक ठरेल. मागील आवृत्त्यांच्या तुलनेत या वर्षी एक नवीन मापदंड निर्माण होईल, याची मला खात्री आहे.”

या ट्रॅकबाबत आपला दृष्टीकोन मांडताना ते म्हणाले, “नवीन ट्रॅकमध्ये अनेक वळणे असून रेसिंगच्या दृष्टीने हा अतिशय कॉम्पॅक्ट ट्रॅक आहे. जोखीम घेण्यास तयार असलेल्या आणि सर्वोच्च मान जिंकण्यासाठी काहीही करू इच्छिणाऱ्या रायडर्ससाठी या ट्रॅकमध्ये खूप काही आहे.”

पुणे इन्व्हिटेशनल  सुपरक्रॉस लीग ही भारतातील सर्वात चर्चित सुपरक्रॉस स्पर्धा असून ती जगातील सुपरक्रॉस रेसिंग कार्यक्रमांमधील फ्रँचायजी आधारित लीगच्या स्वरूपातील पहिलीच स्पर्धा आहे. या वर्षी यात असलेल्या मनोरंजनाच्या प्रमाणामुळे भारतातील मोटोक्रॉस आणि सुपरक्रॉस खेळांमध्येही ही स्पर्धा  क्रांती घडवून आणेल.

या रायडर्सना या तीन दिवसांत सहा मोटो चालवायच्या आहेत आणि टीम रायडर्सना प्रत्येक राऊंडमधील त्यांच्या  कामगिरीनुसार गुण मिळतील. प्रत्येक रेससाठी  गुण दिले जातील आणि सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या रायडरला या लीगचा विजेता म्हणून घोषित केले जाईल. म्हणूनच संपूर्ण चॅम्पियनशिपला उत्तम स्पर्धात्मक धार प्राप्त होईल.

 

शर्यत  प्रकार:

एसएक्स 1 ‘अ’ ग्रुप इंडियन प्रो – क्लास 1 फॉरेन मोटारसायकल 500 सीसीपर्यंत 2 आणि 4 स्ट्रोक

एसएक्स 2 ‘अ’ ग्रुप इंडियन प्रो – क्लास 1 फॉरेन एक्सपर्ट क्लास-2 फॉरेन मोटारसायकल 500सीसीपर्यंत 2 आणि 4 स्ट्रोक

एसएक्स 3 ‘सी’ ग्रुप क्लास 3 इंडियन मोटारसायकल 260 सीसीपर्यंत  2 आणि 4 स्ट्रोक इंडियन  एक्सपर्ट

एसएक्स – जे ज्युनिअर्स ग्रुप ‘अ’ – वर्ग क्लास 4 इंडियन रायडर्स 15 वर्षांखालील 250 सीसीपर्यंत – 2 आणि 4 स्ट्रोक

एसएक्स क्लास ‘अ’ – आंतरराष्ट्रीय रायडर्स – वर्ग-5 फॉरेन मोटारसायकल500सीसीपर्यंत 2 आणि 4 स्ट्रोक