पुणे आय-टी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हरबिंगर, सिमेन्स संघांचे विजय

पुणे । हरबिंगर आणि सिमेन्स या संघांनी आय-टी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर या लढती झाल्या.

यातील पहिल्या लढतीत रोहन अनविकर आणि राजेश निंभोरे यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हरबिंगर संघाने एलटीआय संघावर २५ धावांनी मात केली. हरबिंगर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १६२ धावा केल्या. यात रोहनने ४८ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारसह ५७ धावा केल्या. त्याला राजेश निंभोरेने नाबाद ४७ धावा करून चांगली साथ दिली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना एलटीआय संघाला ६ बाद १३७ धावाच करता आल्या. निंभोरेने ४ गडी बाद केले.

दुसऱ्या लढतीत विशाल रैनाच्या आक्रमक शतकाच्या जोरावर सिमेन्स संघाने परसिसटंट संघावर ९२ धावानी मात केली. सिमेन्स संघाने ४ बाद २१९ धावांपर्यंत मजल मारली. यात रैनाने ५१ चेंडूत १० चौकार व ७ षटकारसह नाबाद ११४ धावा केल्या. यानंतर परसिसटंट संघाला ९ बाद १२७ धावाच करता आल्या.

संक्षिप्त धावफलक :

१) अटोससिंटेल – १९.५ षटकांत सर्वबाद १४१ (तन्मय पाडवे २७, अजितकुमार प्रधान २१, उज्ज्वल ठुसू १९, सचिन शेलार ३-२४, तनिष ठस्कर २-२९, अजय पाटील १-२७, केतन घाडगे १-२१) पराभूत वि. सीबीएसएल – १८ षटकांत ५ बाद १४३ (अतिफ ५०, मनीष ४१, सबिर शेख, अभिनव आनंद १-२१).

२) हरबिंगर – २० षटकांत ५ बाद १६२ ( रोहन अनविकर ५७, राजेश निंभोरे नाबाद ४७, शुभम बुलबुले ३-३६, अंकुर उपाध्याय १-२६) वि. वि. एलटीआय – २० षटकांत ६ बाद १३७ (अरमान पटनाईक ३१, विकास भागवत २४, राजेश निंभोरे ४-२२, रोहन अनविकर १-३९).

३) सिमेन्स – २० षटकांत ४ बाद २१९ (विशाल रैना नाबाद ११४, हिमांशू अगरवाल ४०, अनुराग हंबीर १-२१) वि. वि. परसिसटंट – २० षटकांत ९ बाद १२७ (अनुराग हंबीर नाबाद ३४, स्वारंग साठे २८, मनोज भागवत २-२८, संजय पाटील २-१४).