पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धा २०१८- व्हेरिटास आणि सिमेन्स संघाचा विजय

पुणे | व्हेरिटास आणि सिमेन्स संघांनी प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत व्हेरिटास संघाने आयबीएम संघावर सात गडी राखून सहज मात केली. करण राठोड (४ बळी) आणि अम्रित अलोक (३ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर व्हेरिटास संघाने आयबीएम संघाला ९ बाद १३३ धावांत रोखले.

यानंतर स्वानंद भागवतच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर व्हेरिटास संघाने विजयी लक्ष्य ३ गडींच्या मोबदल्यात १८.५ षटकांत पूर्ण केले. स्वानंदने ५४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारसह नाबाद ६० धावा केल्या.

यानंतर दुस-या लढतीत सिमन्स संघाने डॉइश्च बँक संघावर ८५ धावांनी मात केली. सिमन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १७६ धावा केल्या. यात सौरभ जळगावकरने ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. यानंतर डॉइश्च बँक संघाला ९१ धावांत गुंडाळले. हिमांशू अगरवालने डॉइश्च बँकेचा निम्मा संघ गारद केला.

संक्षिप्त धावफलक : १) आयबीएम : २० षटकांत ९ बाद १३३ (किरण लगड ४१, परिक्षत रॉय २२, करण राठोड ४-३४, अम्रित अलोक ३-२१) पराभूत वि. व्हेरिटास : १८.५ षटकांत ३ बाद १३४ ( स्वानंद भागवत नाबाद ६०, अम्रित अलोक नाबाद ३४, रणवीर मानकू १६, किरण लगड १-१५, धरमवीरसिंग १-२७).

२) सिमन्स : २० षटकांत ८ बाद १७६ (सौरभ जळगावकर ५२, हिमांशू अगरवाल ४७, विशाल रैना २८, दीपककुमार २२, राजशेखरन सी. २-१८, तरण दीपसिंग २-३४, गौरव सचदेव २-३४) वि. वि. डॉइश्च बँक : २० षटकांत सर्वबाद ९१ (बरुण कुट्टी ३८, गौरव सचदेव १५, हिमांशू अगरवाल ५-१८, दीपककुमार २-९).