पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीगच्या लिलावात आर. नटराज, जावेद शेख यांना सर्वाधिक मागणी

पुणे : पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीगच्या बहुप्रतीक्षित चौथ्या आवृत्तीने अंतिम संघांची अधिकृत घोषणा केली आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या लिलावाच्या कार्यक्रमात संघाच्या मालकांनी एकमेकांशी स्पर्धा करून धोरणात्मक विचारांनी एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केलासहभागी संघ मालकांकडून सर्वाधिक बोली प्राप्त करणारे आरनटराज(बंगलोर रायडर) आणि जावेद शेख(गोवा रायडर) हे या लिलावाचे प्रमुख आकर्षण ठरले.

 गतविजेत्या भल्ला रॉयलने आरनटराजसाठी यशस्वी बोली लावलीश्रीविकास भल्ला यांच्या मालकीच्या पुणे स्थित या फ्रँचायझीने 60,000 रुपयांमध्ये या रायडरला प्राप्त केलेआरनटराज हे एसएक्स -3 इंडियन रायडर्सच्या कॅटेगरीत दिसणार आहेत. नटराज हे रेसिंग वर्तुळात सर्वपरिचित चेहरा असून ते वेळेस राष्ट्रीय सुपरक्रॉस चॅम्पियनशिपचे विजेते आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरही असंख्य सामने जिंकले आहेतश्रीअजीत गढोक यांच्या मालकीच्या टीम ग्रिशमने जावेद शेख यांच्यासाठी 53, 000 रुपये दिल्यामुळे ते दुसरे सर्वात महागडे बायकर ठरले.

 या लिलावात 53 रायडर्स सहभागी झाले होते तर सात संघांनी बोली लावल्यापुण्यातील चार रायडर्स लिलावात सहभागी झालेत्यातील एसएक्सजे श्रेणीत 44 हजार रुपयांच्या बोलीसह युवराज कोंडे देशमुख हा प्रमुख आकर्षण ठरला.त्याचसाठी लावण्यात आलेल्या बोलीत पीबी रेसिंग टीम आणि पाषाणकर्समध्ये दुहेरी स्पर्धा दिसून आली आणि यात अखेर पाषाणकर रेसिंग टीमला तो विकला गेला.

 होंडा सीआरफ 250 सीसी बाईकवर सक्रिय दिसणार असलेल्या गयान संदरुवान याला इंडियन एक्सपर्ट्स क्लासमध्ये नॅशनल चॅंपियनचा किताब देण्यात आलाया स्पर्धेत सात आंतरराष्ट्रीय रायडर्सने  त्यांच्या सहभागाची पुष्टी केली होती मात्र ते या लिलावाचा भाग नव्हते. लिलावानंतर झालेल्या खुल्या सोडतीद्वारे त्यांचे संबंधित टीम्सना वाटप करण्यात आलेहे सर्व आंतरराष्ट्रीय रायडर्स एसएक्स श्रेणीत सक्रिय दिसतील.

 या प्रसंगी बोलताना माजी आंतरराष्ट्रीय रायडर आणि विलो इव्हेंट्सचे इव्हेंट डायरेक्टर आणि  पार्टनर ईशान लोखंडे म्हणाले,  या वर्षीच्या बोलीमध्ये संघ मालकांची मानसिकता आणि रणनीती स्पष्ट होती. या लिलावाने पुन्हा एकदा हे दाखवून दिलेकी संघ मालक हळूहळू परंतु निश्चितपणे सुपरक्रॉसच्या बारकाव्यांना समजून घेत आहे आणि हे खरोखरच या खेळासाठी चांगले लक्षण आहेसंघ आणि रायडर्स तयार झालेले असल्याने आता तीन दिवसांच्या अभूतपूर्व रेसिंग फिएस्तासाठी मंच सज्ज आहे.