रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत गिरीश चौगुलेचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का 

पुणे, २२ मे २०१७: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज ११व्या रमेश देसाई मेमोरिअल कुमार राष्ट्रीय(१६ वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या गिरीश चौगुले याने मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असंलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या व बिगरमानांकीत गिरीश चौगुले याने गुजरातच्या व अव्वल मानांकित मधवीन कामतचा ६-४, २-६, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. गुजरातच्या क्रिश पटेल याने सोळाव्या मानांकित व आंध्रप्रदेशच्या आशिष कोमरगिरीचा ६-४, ६-४ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या गार्गी पवारने चंदीगढच्या सृष्टी धीरचा ६-४, ६-१ असा तर, महाराष्ट्राच्या मालविका शुक्लाने राजस्थानच्या रेनी सिंगचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हरियाणाच्या संदीप्ती रावने तेलंगणाच्या अवंतिका रेड्डी टायब्रेकमध्ये ६-७(२), ६-१, ६-० असा पराभव केला. महाराष्ट्राच्या पूजा इंगळे हिने तेलंगणाच्या अंजुम मुशरथचा ६-०, ६-०असा एकतर्फी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: १६ वर्षाखालील मुले: 

गिरीश चौगुले(महा)वि.वि.मधवीन कामत(गुजरात,१)६-४, २-६, ६-४;

क्रिशन हुडा(चंदीगढ)वि.वि.राजेश कन्नन(तामिळनाडू)४-६, ६-४, ६-३;

क्रिश पटेल(गुजरात)वि.वि.आशिष कोमरगिरी(आंध्रप्रदेश,१६)६-४, ६-४;

कबीर हंस(ओरिसा,११)वि.वि.इकबाल खान(तेलंगणा)६-३, ६-४;

अनमोल जैन वि.वि.कृष्णा वेहुरी ६-०, ६-४;

१६ वर्षाखालील मुली: 

गार्गी पवार(महा)वि.वि.सृष्टी धीर(चंदीगढ)६-४, ६-१;

मालविका शुक्ला(महा)वि.वि.रेनी सिंग(राजस्थान)६-२, ६-३;

सुदिप्ता कुमार(महा)वि.वि.रेनी सिंगला(हरियाणा)६-४, ४-६, ७-५;

संदीप्ती राव(हरियाणा)वि.वि.अवंतिका रेड्डी(तेलंगणा)६-७(२), ६-१, ६-०;

जगमीत कौर(दिल्ली)वि.वि.शनाया नाईक(महा)६-२, ६-३;

कशिश भाटिया(दिल्ली)वि.वि.प्रियांशी शर्मा(गुजरात)६-१, ६-२;

स्निग्धा एबीजी वि.वि.श्रुति पंडीथारुन(तामिळनाडू)६-३, ६-३;

पूजा इंगळे(महा)वि.वि.अंजुम मुशरथ(तेलंगणा)६-०, ६-०.