पुणे महापौर चषक साॅफ्टबाॅल स्पर्धेत कोल्हापूर संघाचा विजय  

कोल्हापूर संघाने महापौर चषक जिल्हास्तरीय   साॅफ्टबाॅल स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे जिल्हा संघावर 6-1ने मात करून खिलाडू वृत्तीने साखळी सामन्यातच गतवर्षीच्या अंतीम सामन्यातील पराभवाची परतफेड केली. या अटी तटीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघा कडून स्नेहल, करिष्मा यांनी प्रत्येकी दोन तर वाणी, वैष्णवी यांनी प्रत्येकी एक होमरन केला. कोल्हापूर संघातील स्वप्नाली च्या सुपर फास्ट पिचिंग पुढे पुणे जिल्हा संघातील केवळ अलीझानेच एक होमरन केला.
एस. पी काॅलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मुलीच्या गटात बारामती संघाने इंदापूर संघावर 13-1 ने एकतर्फी मात केली. बारामती संघाकडून प्रणाली, योगिता प्रत्येकी तीन व रूपाली, स्नेहा प्रत्येकी दोन तर रेष्मा, मेघांना , स्नेहा यांनी प्रत्येकी एक होमरन केला मात्र बारामती संघातील रेष्मा पुणेकर हिच्या उत्कृष्ट पिचिंग मुळे इंदापूर संघासाठी अनुराधाने एकच होमरन केला.
या गटातील दुस-या लढतीत मात्र पुणे जिल्हा संघाने पुणे शहर संघावर 1-0 ने मात केली . पुणे जिल्हा संघातील शुभदा हिने एक होमरन केला. व साखळी सामन्यातही पुणे जिल्हा संघाने पुणे शहर संघावर 8-2ने मात केली. पुणे जिल्हा संघातील किरणने दोन तर  आयशा, हजारा, फरा, अलीझा, पूर्वा यांनी प्रत्येकी एक होमरन केला, तर पुणे शहर संघातील मोनाली नातू, मोहिनी गरड यांनीप्रत्येकी एक होमरन केला. मात्र यानंतरच्या सामन्यात पुणेशहर संघाने बारामती संघावर 12-6ने विजय मिळवला. पुणे शहर संघातील प्रतिक्षा मुरकुटे, मोनाली नातू , हर्षदा कासार यांनी प्रत्येकी दोन तर मोहिनी गरड, श्रद्धा, सायली, माधुरी, कविता, संजीवनी यांनीप्रत्येकी एक होमरन केला.
यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर मुली संघाने इंदापूर संघावर 10-0ने एकतर्फी मात केली. कोल्हापूरच्या वाणी, स्नेहल,करिष्मा, रीमा यांनी प्रत्येकी दोन तर ऐश्वर्या, योगेश्वरी यांनी एक होमरन केला.
तसेच कोल्हापूर संघाने बारामती संघावरही 7-0 ने  एकतर्फी मात केली. कोल्हापूर संघातील ऐश्वर्या, वैष्णवी,करिष्मा, वाणी, स्नेहल, स्वप्नाली, गायत्री यांनी प्रत्येकी एक होमरन केला.
मात्र शेवटचा कोल्हापूर विरूद्ध पुणे शहर सामना 0-0 ने अनिर्णित अवस्थेत संपला  व काही प्रमाणात कोल्हापूर संघाचा विजयी रथ पुणे शहर संघाने थाबवला.व स्पर्धाती उत्सुकता वाढवली.
दुपारच्या सत्रात मुलांच्या गटात अहमदनगर संघाने सांगली संघावर 4-0ने मात केली.अहमदनगर संघातील प्रतीकने होमर मारून दोन होमरन तर पवन,भुषण यांनी प्रत्येकी एक होमरन केला.
त्यानंतर झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबई संघावर  2-1ने मात केली. कोल्हापूर संघातील शुभमने होमर मारून त्याने एक व कल्पेशने एक होमरन केला.तर मुंबई संघातील कौस्तुभने एक होमरन केला.
साखळी सामन्यात कोल्हापूर संघाने अहमदनगर संघावर 9-1 ने मात केली कोल्हापूर संघातील ऋतीक फाटे, ऋतीक ओंबासे, व ऋषी यांनी प्रत्येकी दोन तर आकाश, कल्पेश, आशपाक यांनी प्रत्येकीएक होमरन केला. व अहमदनगर संघातील तुषार एक होमरन केला.
त्यानंतर झालेल्या सामन्यात मुंबई संघाने सांगली संघावर 6-4ने मात केली.मुंबई संघातील कौस्तुभने दोन तर प्रतिक,विनीत,ऋषी पाटील, ऋषी यांनी प्रत्येकी एक होमरन केला. तर सांगलीच्या गणेश, अतुल, तेजस, प्रथमेश यांनी प्रत्येकी एक होमरन केला.
अहमदनगर व मुंबई संघाने खेळाचे उत्तम प्रदर्शन केले. अहमदनगर संघाने मुंबई संघावर 3-2ने मात केली. अहमदनगर संघातील प्रतीक, प्रशांत, अनिकेत यांनी प्रत्येकी एक होमरन केला तर मुंबई संघातील कौस्तुभ, विनीत यांनी प्रत्येकी एक होमरन केला.
शेवटचा सामना कोल्हापूर व सांगली याच्यात झाला परंतू तो अनिर्णित अवस्थेत संपला.