पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा सलग दुसरा विजय

पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाने मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा 43-42 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या अतितटीच्या झालेल्या लढतीत पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाने मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा 43-42 असा पराभव केला.

पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाकडून आस्मि टिळेकर, अभिराम निलाखे, सार्थ बनसोडे, सिमरन छेत्री, अमोद सबनीस, अर्णव बनसोडे, मोक्ष सुगंधी, आदित्य राय यांनी अफलातून कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.

मेट्रोसिटी रेजिंग बुल्सकडून नील देसाई, शार्दुल खवळे, प्रिशा शिंदे, वरद पोळ, अथर्व येलभर, अवंती राळे, आदित्य ठोंबरे यांनी विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स वि.वि.मेट्रोसिटी रेजिंग बुल्स 43-42

(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: शौर्य गदादे पराभूत वि.नील देसाई 1-4; 10वर्षाखालील मुले: मनन अगरवाल पराभूत वि.शार्दुल खवळे 0-4; 10वर्षाखालील मुली: आस्मि टिळेकर वि.वि.स्वनिका रॉय 4-3(3); 12वर्षाखालील मुले: अभिराम निलाखे वि.वि.अद्विक नाटेकर 6-5(4); 12वर्षाखालील मुली: वैष्णवी सिंग पराभूत वि.प्रिशा शिंदे 3-6; 14वर्षाखालील मुले: सार्थ बनसोडे वि.वि.शौर्य रोडे 6-0; 14वर्षाखालील मुली: सिमरन छेत्री वि.वि.संचिता नगरकर 6-4; कुमार दुहेरी गट: अमोद सबनीस/अर्णव बनसोडे वि.वि.जय पवार/जश शहा 6-5(4); 14वर्षाखालील दुहेरी गट: मोक्ष सुगंधी/आदित्य राय वि.वि.विरेन चौधरी/मानस गुप्ता 6-1; 10वर्षाखालील दुहेरी गट: दक्ष पाटील/प्रज्ञेश शेळके पराभूत वि.वरद पोळ/अथर्व येलभर 0-4; मिश्र दुहेरी गट: समृद्धी भोसले/अभिनिल शर्मा पराभूत वि.अवंती राळे/आदित्य ठोंबरे (2)5-6);