पुणे ओपन: भारताच्या कारमान कौर थंडी व रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0 409

 जॉकलीन अदिना क्रिस्टीन व तेरेझा मिहालीकोवा यांना दुहेरीचे विजेतेपद

पुणे | आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीएएमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेतभारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीने थायलंडच्या बिगर मानांकीत बुनयावी थामचायवात हीचा तर रोमानीयाच्या दुस-या मानांकीतजॉकलीन अदिना क्रिस्टीन हीने भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईचा पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला.

 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिसश्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुलम्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्य फेरीत एक तास चार मिनिटे रंगलेल्या लढतीत भारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीने थायलंडच्या बिगर मानांकीत बुनयावी थामचायवात हीचा 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. आपल्या कामगिरीत सातत्य राखत कारमानने उत्कृष्ठ सर्व्हिस करत बुनयावीवर विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत एक तास बारा मिनिटे चाललेल्या लढतीत भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईला रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॉकलीन अदिना क्रिस्टीन कडून 6-4, 6-3 असा पराभव पत्करावा लागला.

 

दुहेरी गटात अंतिम फेरीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन व स्लोवाकीयाच्या तेरेझा मिहालीकोवा या जोडीने एक तास आकरा मिनिट चाललेल्या लढतीत चायनीज तायपेच्या पीची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांचा 4-6, 6-3, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

 

दुहेरी गटातील विजेत्या खेळाडूंना 1500 डॉलर, करंडक व 50 डब्लुटीए गुण तर उपविजेत्या खेळाडूंना 900 डॉलर, करंडक व 30 डब्लुटीए गुण देण्यात आले. दुहेरी गटातील स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोथरूडच्या आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, नियोजन सचिव अश्विन गिरमे, पुणे ओपन फाऊंडेशनचे सदस्य शिवाजी चौधरी, समिर भांबरे व आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- उपांत्य फेरी

कारमान कौर थंडी(भारत,3) वि.वि बुनयावी थामचायवात(थायलंड)- 6-3, 6-1

 

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2)  वि.वि झील देसाई(भारत) 6-4, 6-3

 

दुहेरी गट- अंतिम फेरी

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया)/ तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,4) वि.वि पीची ली(चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया,3) 4-6, 6-3, 10-7

Comments
Loading...
%d bloggers like this: